रेल्वे मंत्रालय
मुंबई उपनगरी रेल्वे जाळ्याच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर क्षमता विकास कामे सुरू; एमयुटीपी प्रकल्पाच्या विस्ताराला चालना
नवीन स्थानके, टर्मिनल्स आणि क्षमता विकास कामांसह पुणे रेल्वे पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी सज्ज
Posted On:
25 MAR 2026 9:16PM by PIB Mumbai
मुंबई, 25 मार्च 2026
सध्या मुंबईहून दररोज सुटणाऱ्या मेल / एक्सप्रेस गाड्यांची संख्या 120 आहे आणि सुमारे 3,200 उपनगरी रेल्वे गाड्यांची सेवा मुंबईच्या रेल्वे जाळ्यामार्फत दिली जाते. मुंबईत रेल्वे वाहतूक खूप मोठ्या प्रमाणावर चालते आणि या सेवेचा लाभ अनेक प्रवासी घेत असतात याचे हे द्योतक आहे.
मुंबई क्षेत्रातील क्षमता वाढविण्याची कामे:
मुंबई परिसरातील विविध स्थानकांवर गाड्या हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी खालील कामे पूर्ण करण्यात आली आहेत / सुरू करण्यात आली आहेत / नियोजित आहेत.
|
SN
|
स्थान
|
तपशील
|
|
1
|
वांद्रे टर्मिनस
|
3 पिट लाईन्स पूर्ण झाल्या आहेत
|
|
2
|
मुंबई सेंट्रल
|
24 एलएचबी कोचेससाठी प्लॅटफॉर्म विस्तार
|
|
3
|
जोगेश्वरी
|
2 अतिरिक्त प्लॅटफॉर्म
|
|
4
|
दादर
|
1 अतिरिक्त प्लॅटफॉर्म
|
|
5
|
वसई रोड
|
6 प्लॅटफॉर्म, 3 पिट लाईन्स आणि 5 स्टेबलिंग लाईन्स
|
|
6
|
पनवेल–कळंबोली
|
5 प्लॅटफॉर्म, 4 पिट लाईन्स आणि 2 सिक लाईन्स
|
|
7
|
कल्याण
|
6 प्लॅटफॉर्म आणि 4 पिट लाईन्स
|
|
8
|
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)
|
4 प्लॅटफॉर्म आणि 2 पिट लाईन्स
|
|
9
|
परळ
|
6 प्लॅटफॉर्म, 5 पिट लाईन्स, 6 स्टेबलिंग लाईन्स
|
|
10
|
विरार
|
25 स्टेबलिंग लाईन्स
|
|
11
|
डहाणू रोड
|
11 स्टेबलिंग लाईन्स
|
|
12
|
मीरा रोड
|
25 स्टेबलिंग लाईन्स
|
स्थानकाची लांबी वाढवण्याचे काम:
वरील कामांव्यतिरिक्त, 34 स्थानकांवर 15 कार इएमयु (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट – विद्युत मोटर असलेली उपनगरी गाडी) गाड्या सामावून घेता याव्यात यासाठी स्थानकाची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प:
मुंबई उपनगरी क्षेत्रातील रेल्वे नेटवर्कची क्षमता सुधारण्यासाठी खालील प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे: मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-II (एमयुटीपी-II) खर्च ₹8,087 कोटी, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III (एमयुटीपी-III) खर्च ₹10,947 कोटी, आणि मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-IIIA (एमयुटीपी-IIIA) खर्च ₹33,690 कोटी. या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरी क्षेत्रातील विविध कामांचा समावेश आहे.
|
क्र
|
प्रकल्पाचे नाव
|
खर्च (कोटी रुपये)
|
|
1
|
CSMT–कुर्ला 5वी आणि 6वी लाईन (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-II) (17.5 किमी)
|
891
|
|
2
|
मुंबई सेंट्रल–बोरीवली 6वी लाईन (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-II) (30 किमी)
|
919
|
|
3
|
हार्बर लाईनचा विस्तार गोरेगाव–बोरीवली (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-IIIA) (7 किमी)
|
826
|
|
4
|
बोरीवली–विरार 5वी आणि 6वी लाईन (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-IIIA) (26 किमी)
|
2,184
|
|
5
|
विरार–दहानू रोड 3री आणि 4थी लाईन (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III) (64 किमी)
|
3,587
|
|
6
|
पनवेल–कर्जत उपनगरी कॉरिडॉर (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III) (29.6 किमी)
|
2,782
|
|
7
|
ऐरोली–कलवा (उंचावर) उपनगरी कॉरिडॉर लिंक (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III) (3.3 किमी)
|
476
|
|
8
|
कल्याण–आसंगाव 4 थी लाईन (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-IIIA) (32 किमी)
|
1,759
|
|
9
|
कल्याण–बदलापूर 3 री आणि 4 थी लाईन (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-IIIA) (14 किमी)
|
1,510
|
|
10
|
कल्याण–कसारा 3 री लाईन (67 किमी)
|
793
|
|
11
|
नायगाव–जुईचंद्रा डबल कॉर्ड लाईन (6 किमी)
|
176
|
|
12
|
निलजे–कोपर डबल कॉर्ड लाईन (5 किमी)
|
338
|
|
13
|
कल्याण यार्ड पुनर्रचना काम
|
866
|
गाड्यांची नवीन आवृत्ती:
प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी 12 डब्यांच्या 238 रेक्स (प्रत्येकात दरवाजे असलेले) गाड्यांना मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III आणि IIIA अंतर्गत ₹19,293 कोटी खर्चाने मंजुरी देण्यात आली आहे. रेक्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे क्षेत्रातील क्षमता वाढविण्याची कामे:
सध्या पुणे क्षेत्रात दररोज सुमारे 33 मेल/एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत.
पुणे परिसरातील विविध स्थानकांवर गाड्या हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी खालील कामे पूर्ण करण्यात आली आहेत / सुरू करण्यात आली आहेत / नियोजित आहेत.
|
SN
|
ठिकाण
|
तपशील
|
|
1
|
पुणे जंक्शन
|
६ नवीन स्थानके (प्लॅटफॉर्म) आणि ५ स्थानकांचे विस्तार.
|
|
2
|
हडपसर
|
पूर्ण लांबीच्या गाड्या हाताळण्यासाठी ३ स्थानकांचा विस्तार
|
|
3
|
खडकी
|
स्थानक क्रमांक 3/4 उंचावणे आणि विस्तार तसेच धावत्या मार्गांचा विस्तार जुलै 2025 मध्ये पूर्ण झाला आहे.
|
|
4
|
आळंदी
|
नवीन कोचिंग टर्मिनल – 9 अतिरिक्त स्थानके, 8 पिट लाइन्स आणि 8 स्टॅबलिंग लाईन्स
|
|
5
|
फुरसुंगी
|
5 स्टेबलिंग लाईन्स.
|
वरील कामांव्यतिरिक्त, पुणे क्षेत्रातील गाड्या हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी खालील अतिरिक्त कामे हाती घेण्यात आली आहेत.
|
SN
|
प्रकल्पाचे नाव
|
|
1
|
हडपसर–घोरपुरी यार्ड: तिसरी लाईन बांधकाम.
|
|
2
|
पुणे–दौंड विभाग: मांजरी भद्रुक येथे नवीन ब्लॉक स्थानक.
|
|
3
|
पुणे–सासवड विभाग: रामटेकडी येथे नवीन ब्लॉक स्थानक. द्विमार्गी सिग्नलिंग काम.
|
लोकसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2245691)
अभ्यागत कक्ष : 158