रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी वाढ; निधी गेला 23,778 कोटी रूपयांवर


2025-26 या वर्षासाठी महाराष्ट्राच्या रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्‍ये वीस पटींहून अधिक वाढ होऊन निधी 23,778 कोटी रूपयांवर पोहोचला

15 डब्यांच्या ईएमयू गाड्या सामावून घेण्यासाठी मुंबईतील 34 स्थानकांवर फलाटांच्या विस्ताराचे काम पूर्ण

रेल्वे पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे: अहिल्यानगर, आसनगाव, बदलापूर, बारामती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पनवेल, परळी वैजनाथ, तुळजापूर आणि वर्धा

महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण; यामध्ये ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकांवरील पायाभरणीचे काम, तसेच बीकेसी स्थानकावरील उत्खननाच्या कामाचा समावेश

पुणे-मिरज-लोंडा दुपदरीकरण आणि जबलपूर-गोंदिया गेज रूपांतरण यांसारखे प्रमुख रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्‍यात यश

Posted On: 18 MAR 2026 4:41PM by PIB Mumbai

मुंबई, 18 मार्च 2026

 

महाराष्ट्रामध्ये मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

रेल्वे अर्थसंकल्प:

गेल्या पाच वर्षांत महाराष्‍ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत पूर्णपणे किंवा अंशतः समाविष्ट असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सुरक्षाविषयक कामांसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद खालीलप्रमाणे आहे:

कालावधी

खर्चाची तरतुदी

2009 – 14

1,171 कोटी रूपये प्रतिवर्ष

2025 – 26

23,778 कोटी रूपये (20 पटीपेक्षा जास्‍त)

 

रेल्वे मार्गिका बांधणे- तयार करणे:

2009-14 आणि 2014-25 या कालावधीत, संपूर्णतः किंवा अंशतः महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असलेल्या नवीन मार्गाच्या बांधकामाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

कालावधी

नवीन मार्गिकेचे कार्यादेश

नवीन मार्गिकेच्या कार्यादेशाची सरासरी

2009 ते 14

292 किलोमीटर

58.4 किलोमीटर

2014 ते 25

2,292 किलोमीटर

208.4 किेलोमीटर प्रतिवर्ष

(तिपटीपेक्षा जास्‍त)

 

मंजूर प्रकल्प:

दिनांक 1 एप्रिल, 2025 रोजीच्या स्थितीनुसार, महाराष्ट्रात पूर्णतः किंवा अंशतः समाविष्ट असलेले, एकूण 5,098 किमी लांबीचे आणि 89,780 कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेले एकूण 38 प्रकल्प (यामध्‍ये 11 नवीन मार्गिका, दोन गेज रूपांतरण आणि 25 मार्गिकांचे दुपदरीकरण) मंजूर करण्यात आले आहेत.

याचा सारांश खालीलप्रमाणे आहे:-

वर्ग

मंजूर प्रकल्पांची संख्या

एकूण लांबी किलोमीटरमध्‍ये

मार्च 25 पर्यंत पूर्ण झालेली लांबी किलोमीटरमध्‍ये

खर्च

(कोटी रूपयांमध्ये)

नवी मार्गिका

11

1,355

234

10,504

गेज रूपांतरण

02

609

334

4,286

दुहेरीकरण/ बहु-ट्रॅकिेंग

25

3,134

1,792

24,617

एकूण

38

5,098

2,360

39,407

 

अलिकडच्या काळात पूर्ण झालेले प्रकल्प:

महाराष्ट्रामध्ये पूर्णतः किंवा अंशतः समाविष्ट असलेल्या, नुकतेच, अलिकडच्या काळात पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अनुक्रम

प्रकल्पाचे नाव

खर्च (कोटी रूपयांमध्‍ये

1

पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण (467 किमी)

4,670

2

जबलपूर -गोंदिया गेज रूपांतरण (300 किमी)

2,005

3

छिंदवाडा -नागपूर गेज रूपांतरण (150 किमी)

1,512

4

पनवेल -पेण दुपदरीकरण (35 किमी)

263

5

पेण- रोहा दुपदरीकरण (40 किमी)

330

6

उधना -जळगावा दुपदरीकरण (307 किमी)

2,448

7

मुदखेड-परभणी दुपदरीकरण (81किमी)

673

8

भुसावळ-जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी)

325

9

जळगाव- भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी)

261

10

दौंड- गुलबर्गा दुपदरीकरण (225 किमी)

3,182

 

सध्या सुरू असलेले प्रकल्प:

महाराष्ट्र राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी, खालील कामे हाती घेण्यात आली आहेत:-

अनुक्रम

प्रकल्पाचे नाव

खर्च

(कोटी रूपयांमध्‍ये)

1

अहिल्यानगर (अहमदनगर)-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी)

4,957

2

बारामती -लोणंद नवीन मार्गिका (64 किमी)

1,844

3

वर्धा- नांदेड नवीन मार्गिका (284 किमी)

3,445

4

इंदूर- मनमाड नवीन मार्गिका (360 किमी)

18,529

5

वडसा -गडचिरोली नवीन मार्गिका (52 किमी)

1,886

6

जालना- जळगान नवीन मार्गिका (174 किमी)

5,804

7

दौंड-मनमाड दुपदरीकरण (236 किमी)

3,037

8

कल्याण- कसारा तिसरी मार्गिका (68 किमी)

1,433

9

वर्धा -नागपूर तिसरी मार्गिका ( 76 किमी)

698

10

वर्धा-बल्लारशाह तिसरी मार्गिका ( 132 किमी)

1,385

11

इटारसी- नागपूर तिसरी मार्गिका ( 280किमी)

2,450

12

राजनांदगाव - नागपूर तिसरी मार्गिका ( 228किमी)

3,545

13

वर्धा -नागपूर चौथी मार्गिका ( 79 किमी)

1,137

14

भुसावळ-खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका (95 किमी)

3,285

15

जळगाव – मनमाड चौथी मार्गिका (160 किमी)

2,574

16

सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद(धाराशिव)नवीन मार्गिका – (95 किमी)

2,933

17

पनवेल-चौक दुपदरीकरण (17 किमी)

491

18

वर्धा-बल्लारशाह चौथी मार्गिका ( 135 किमी)

2,226

19

इटारसी- नागपूर चौथी मार्गिका ( 297किमी)

5,010

20

वर्धा-भुसावळ तिसरी आणि चौथी मार्गिका(314 किमी)

9,197

21

असनगाव -कसारा चौथी मार्गिका (35 किमी)

794

22

बदलापूर- कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका(32 किमी)

1,324

23

गोंदिया – डोंगरगड चौथी मार्गिका (84 किमी)

2,223

24

गोंदिया – बल्लारशाह दुपदरीकरण (240 किमी)

4,819

 

मुंबई परिसरात रेल्वेगाड्या हाताळण्याची क्षमता वाढवणे:

सध्या, मुंबई परिसरातून दररोज सुमारे 120 मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि सुमारे 3,200 उपनगरीय गाड्यांचे संचालन केले जाते. मुंबई परिसरातील विविध स्थानकांवर रेल्वेगाड्या हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी, विविध स्थानकांवर खालील कामे पूर्ण झाली आहेत/ हाती घेण्यात आली आहेत/नियोजित आहेत:

अनु क्र

ठिकाण

तपशील

1

वांद्रे टर्मिनस

3 पिट लाईन्सचे काम पूर्ण

2

मुंबई सेंट्रल

24 एलएचबी डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार

3

जोगेश्वरी

2 अतिरिक्त प्लॅटफॉर्म

4

दादर

1 अतिरिक्त प्लॅटफॉर्म

5

वसई रोड

6 प्लॅटफॉर्म , 3 पिट लाईन्स आणि 5 स्टॅबलिंग लाईन्स

6

पनवेल- कळंबोली

5 प्लॅटफॉर्म , 4 पिट लाईन्स आणि  2 सिक लाईन्स

7

कल्याण

6 प्लॅटफॉर्म आणि 4 पिट लाईन्स

8

एलटीटी

4 प्लॅटफॉर्म आणि 2 पिट लाईन्स

9

परळ

6 प्लॅटफॉर्म , 5 पिट लाईन्स, 6 स्टॅबलिंग लाईन्स

10

विरार

25 स्टॅबलिंग लाईन्स

11

डहाणू रोड

11 स्टॅबलिंग लाईन्स

12

मीरारोड

25 स्टॅबलिंग लाईन्स

याव्यतिरिक्त, 15 डब्यांच्या ईएमयू गाड्या सामावून घेण्यासाठी 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे.

 

क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प:

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील रेल्वे नेटवर्कची क्षमता सुधारण्यासाठी 8,087 कोटींचा मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)-II, 10,947 कोटींचा एमयूटीपी-III आणि ₹33,690 कोटींचा एमयूटीपी--IIIA मंजूर करण्यात आले आहेत.

या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील खालील कामांचा समावेश आहे:

अनु क्र

प्रकल्पाचे नाव

खर्च

(कोटी रुपये)

1

सीएसएमटी-कुर्ला 5वी आणि 6वी लाईन (एमयूटीपी-II) (17.5 किमी)

891

2

मुंबई सेंट्रल-बोरिवली 6वी लाईन (एमयूटीपी-II) (30 किमी)

919

3

गोरेगाव ते बोरिवली हार्बर लाईनचा विस्तार (एमयूटीपी-IIIA) (7 किमी)

826

4

बोरिवली-विरार 5वी आणि 6वी लाईन (एमयूटीपी-IIIA) (26 किमी)

2,184

5

विरार-डहाणू रोड 3री आणि 4थी लाईन (एमयूटीपी-III) (64 किमी)

3,587

6

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (एमयूटीपी-III) (29.6 किमी)

2,782

7

ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (एमयूटीपी-III) (3.3 किमी)

476

8

कल्याण-आसनगाव चौथी लाईन (एमयूटीपी-IIIA) (32 किमी)

1,759

9

कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन (एमयूटीपी-IIIA) 14किमी)

1,510

10

कल्याण-कसारा तिसरी लाईन (67कि       मी)

793

11

नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन (6 किमी)

176

12

निलजे-कोपर डबल कॉर्ड लाईन (5 किमी)

338

13

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग काम

866

 

अत्याधुनिक रेल्वेगाड्या:

प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी, एमयूटीपी-III आणि IIIA अंतर्गत ₹19,293 कोटी खर्चाने, दरवाजे असलेल्या प्रत्येकी 12 डब्यांच्या 238 रेक्सना मंजुरी देण्यात आली आहे. या रेक्सच्या खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

पुणे परिसरातील क्षमता वाढीची कामे:

सध्या, पुणे परिसरातून दररोज सुमारे 33 मेल/ एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक होत आहे.

पुणे परिसरातील विविध स्थानकांवर गाड्यांच्या संचालनाची क्षमता वाढवण्यासाठी, विविध स्थानकांवर खालील कामे पूर्ण झाली आहेत/हाती घेण्यात आली आहेत/नियोजित आहेत:

अनु क्र

ठिकाण

तपशील

1

पुणे जंक्शन

6 अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि 5 प्लॅटफॉर्मचा विस्तार

2

हडपसर

पूर्ण लांबीच्या गाड्या हाताळण्यासाठी 3 प्लॅटफॉर्मचा विस्तार

3

खडकी

प्लॅटफॉर्म- 3/4 ची उंची वाढवणे व विस्तार आणि रनिंग लाईन्सचा  विस्तार जुलै 2025 मध्ये पूर्ण

4

आळंदी

9 अतिरिक्त प्लॅटफॉर्म, 8 पिट लाईन्स आणि 8 स्टेबलिंग लाईन्ससह नवीन कोचिंग टर्मिनल

5

फुरसुंगी

फुरसुंगी येथे 5  स्टेबलिंग लाईन्स

 

याव्यतिरिक्त, ट्रेन हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी पुणे परिसरात खालील क्षमतावृद्धीची कामे हाती घेण्यात आली आहेत:

अनु क्र

प्रकल्पाचे नाव

1

हडपसर आणि घोरपडी यार्ड दरम्यान तिसरी लाईन

2

पुणे-दौंड विभागातील मांजरी भद्रुकी येथे आणि पुणे-सासवड विभागातील रामटेकडी येथे नवीन ब्लॉक स्टेशन

3

पुणे-सासवड रस्ता विभागात दोन्ही दिशेने सिग्नलिंग प्रणाली

 

बुलेट ट्रेन प्रकल्प:

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्प (508 किमी) हा सध्या अंमलबजावणी सुरु असलेला एकमेव एचएसआर प्रकल्प आहे. हा प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जात असून, यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे 12 स्थानके नियोजित आहेत.

एमएएचएसआर प्रकल्पासाठीची संपूर्ण जमीन (1,389.5 हेक्टर) संपादित करण्यात आली. सर्व वैधानिक मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व 1651 सुविधांचे स्थलांतर करण्यात आले. महाराष्ट्रात भूसंपादनासाठी झालेल्या विलंबामुळे 2021 पर्यंत प्रकल्पावर परिणाम झाला. 2022 मध्ये महाराष्ट्रात भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली.

विविध प्रमुख घटकांची आतापर्यंतची प्रगती पुढील प्रमाणे:

गुजरात (352 किमी):

घटक

प्रगती

पाया

352 kms.

स्तंभ

352 kms.

गर्डर कास्टिंग

342 kms.

गर्डर उभारणी

331 kms.

ट्रॅक बेडचे बांधकाम

152 kms.

ओएचई खांबांची उभारणी

121 kms.

महाराष्ट्र (156 किमी):

घटक

प्रगती

पाया

84 kms.

स्तंभ

75 kms.

गर्डर कास्टिंग

12 kms.

गर्डर उभारणी

5 kms.

 

एकूण 12 स्थानकांपैकी 8 स्थानकांवर (वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, आणंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती) पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्र विभागात 3 स्थानकांवर (ठाणे, विरार, बोईसर) पायाभरणीचे काम सुरू असून बीकेसी स्थानकात खोदकामाचे काम पूर्ण होत आले आहे आणि बेस स्लॅबची कास्टिंग सुरू झाली आहे.

17 नदी पुलांचे काम पूर्ण झाले आहे. गुजरातमध्ये 4 प्रमुख नदी पुलांचे (नर्मदा, माही, ताप्ती आणि साबरमती) काम पुढील टप्प्यात आहे, तर महाराष्ट्रात 4 नदी पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. डेपोंचे (ठाणे, सुरत आणि साबरमती) काम जोरात सुरू आहे.

वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) नागरी कामे समाधानकारक गतीने सुरू आहेत. खोदकामांनी सुमारे 91% प्रगती साधली असून, काँक्रीटीकरणाची कामे विविध टप्प्यांवर आहेत; यामध्ये लेव्हल-4 (Level-4) वरील बेसमेंट स्लॅबचे 100% काम पूर्ण झाले आहे. समुद्राखालील बोगद्याचे काम (सुमारे 21 किमी) सुरू झाले असून त्यापैकी महाराष्ट्रातील घणसोली ते शीळफाटा दरम्यानच्या 4.8 किमी लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

वेगवान प्रवासी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी, बुलेट ट्रेन स्थानकांचे, सध्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क आणि आगामी मेट्रो मार्गांशी मल्टी-मोडल एकत्रीकरण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या एकत्रीकरणामध्ये बीकेसी स्थानकावरील पादचारी मार्गिकेद्वारे मेट्रो-2 बी आणि मेट्रो-3 बरोबर कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा अतिशय गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. नागरी बांधकाम, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि दूरसंचार आणि रेल्वेगाड्यांचा पुरवठा, यासारखी सर्व संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या पूर्ततेसाठीची नेमकी कालमर्यादा सांगता येईल.

 

समर्पित मालवाहतूक मार्गिका:

पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका (डीएफसी) महाराष्ट्रातून देखील जाते. पश्चिम डीएफसी चा सुमारे 178 किमी भाग महाराष्ट्रात आहे, जो पश्चिम समर्पित मार्गिकेच्या एकूण लांबीच्या सुमारे 12% आहे.

या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील 'न्यू घोलवड' ते 'न्यू वैतरणा' दरम्यानचा पर्यंतचा 76 किलोमीटरचा भाग यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे. उर्वरित कामे हाती घेण्यात आली आहेत.

डब्ल्यूडीएफसी आणि जेएनपीटी यांना जोडल्यामुळे बंदरापासून दिल्ली-एनसीआर दरम्यान मालवाहतूक आणि कंटेनर वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढवेल.

रेल्वे प्रकल्प पूर्ण होणे विविध घटकांवर अवलंबून असते, यात पुढील बाबींचा समावेश आहे:

  • राज्य शासनाकडून भूसंपादन
  • वन विभागाची मंजुरी
  • बाधित होणाऱ्या उपयुक्त सेवांचे (Utilities) स्थलांतर
  • विविध प्राधिकरणांकडून आवश्यक वैधानिक मंजुऱ्या
  • संबंधित क्षेत्राची भौगोलिक आणि भूस्थानिक स्थिती
  • प्रकल्पाच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती
  • प्रकल्प स्थळावर वर्षभरात कामासाठी उपलब्ध असलेले कामकाजाचे महीने, इत्यादी.

या सर्व घटकांचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी आणि खर्चावर परिणाम होतो.

रेल्वे प्रकल्पांच्या प्रभावी आणि जलद अंमलबजावणीसाठी सरकारने केलेल्या विविध उपायांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • निधीच्या वाटपात भरीव वाढ.
  • क्षेत्रीय स्तरावर अधिकारांचे वाटप.
  • विविध टप्प्यांवर प्रकल्पांच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण.
  • भूसंपादन, वन व वन्यजीव विषयक मंजुऱ्यांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी, तसेच प्रकल्पांशी संबंधित इतर प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारे आणि संबंधित प्राधिकरणांकडे नियमित पाठपुरावा.

रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | शिल्पा नीलकंठ/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2242965) अभ्यागत कक्ष : 32
Read this releasein: English