कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पुण्यात त्रैमासिक पेन्शन अदालतीचे आयोजन; बहुतांश प्रकरणे जागीच निकाली
Posted On:
18 MAR 2026 11:14AM by PIB Mumbai
संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाच्या वतीने 16 मार्च, 2026 रोजी पुणे येथील दूरसंचार महाव्यवस्थापक (पीजीएमटी) कार्यालयात त्रैमासिक पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोव्याचे संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत पार पडली.
पेन्शन अदालतीत विचारार्थ एकूण पाच अर्ज प्राप्त झाले. सर्व प्रकरणांचे काळजीपूर्वक परीक्षण करून सीसीएस (पेन्शन) नियमांमधील तरतुदींनुसार ती निकाली काढण्यात आली. याव्यतिरिक्त, इतर युनिट्सच्या पेन्शन संबंधित समस्यांबद्दलची सुमारे 30 प्रकरणेही चर्चेसाठी घेण्यात आली, त्यापैकी बहुतेक प्रकरणांवर जागीच तोडगा काढण्यात आला.
कार्यवाही दरम्यान उपस्थित असलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी सीसीए महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाच्या पारदर्शक आणि कार्यक्षम कामकाजाबद्दल कौतुकाची भावना व्यक्त केली. तसेच, आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य आणि मदतीचाही त्यांनी उल्लेख केला.
पेन्शन अदालतीसमोर आणल्या जाणाऱ्या प्रकरणांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे निदर्शनास आणून देत डॉ. सतीश चंद्र झा यांनी पेन्शन निपटारा यंत्रणेची वाढती कार्यक्षमता आणि परिणामकारकता यातून दिसून येत असल्याचे म्हटले.
***
NehaKulkarni / ManjiriGanoo / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2241610)
अभ्यागत कक्ष : 51