सांस्कृतिक मंत्रालय
देशभरातील संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी सरकारकडून लक्षणीय प्रमाणात निधीची तरतूद
Posted On:
16 MAR 2026 8:58PM by PIB Mumbai
मुंबई, 16 मार्च 2026
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे तसेच अवशेष कायदा, 1958 मधील तरतुदीच्या अंतर्गत संरक्षित म्हणून जाहीर केलेली स्मारके आणि पुरातत्वीय स्थळांचे संवर्धन आणि देखभालीचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थान एएसआयतर्फे तसेच महाराष्ट्र सरकारच्या राज्य पुरातत्वशास्त्र विभागातर्फे अशा दोन्हींकडून संरक्षित करण्यात आलेले नाही. एएसआयतर्फे आवश्यकता,प्राधान्य आणि स्त्रोतांची उपलब्धता यांच्यानुसार संरक्षित स्मारके आणि संरक्षित भाग (स्थळे) यांचे संवर्धन आणि देखभाल करण्यात येते. राष्ट्रीय संवर्धन धोरण, 2014 ला अनुसरून, नियमित पातळीवर ही कार्ये हाती घेण्यात येतात. सध्या,एएमएएसआर कायदा, 1958 अंतर्गत देशभरातील 3,686 स्थळे संरक्षित स्मारके आणि संरक्षित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
देशभरातील संरक्षित स्मारके आणि संरक्षित क्षेत्रे यांचे संवर्धन आणि देखभालीसाठी गेल्या तीन वर्षांत मंजूर करण्यात आलेला निधी आणि झालेला प्रत्यक्ष खर्च यांचे तपशील खाली दिले आहेत:
(रक्कम कोटी रुपयांमध्ये)
|
वर्ष
|
मंजूर निधी |
खर्च |
|
2022–23
|
392.71
|
391.93
|
|
2023–24
|
443.53
|
443.53
|
|
2024–25
|
313.43
|
313.04
|
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2240973)
अभ्यागत कक्ष : 68