रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्नोत्तरे : मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षा

Posted On: 13 MAR 2026 6:26PM by PIB Mumbai

 

मुंबईच्या परिसरातील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे. सध्या मुंबई परिसरातून दररोज सुमारे 120 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सुमारे 3,200 उपनगरीय गाड्यांची सेवा दिली जाते. मुंबई परिसरातील विविध स्थानकांवरील गाड्या हाताळण्याच्या क्षमतेत वृद्धी घडवून आणण्याच्या उद्देशाने खाली नमूद कामे पूर्ण करण्यात आली आहेत, हाती घेतली आहेत किंवा विविध स्थानकांवर नियोजित आहेत :


 

अ.क्र.

स्थानक / ठिकाण

तपशील

1

वांद्रे टर्मिनस

3 पिट लाईन्स पूर्ण झाल्या आहेत

2

मुंबई सेंट्रल

24 एलबीएच डब्यांसाठी फलाटांचा विस्तार

3

जोगेश्वरी

2 अतिरिक्त फलाट

4

दादर

1 अतिरिक्त फलाट

5

वसई रोड

6 फलाट, 3 पिट लाईन्स आणि 5 स्टेबलिंग लाईन्स

6

पनवेल-कळंबोली

5 फलाट, 4 पिट लाईन्स आणि 2 सिक लाईन्स

7

कल्याण

6 फलाट आणि 4 पिट लाईन्स

8

लोकमान्य टिळक टर्मिनस 

4 फलाट आणि 2 पिट लाईन्स

9

परळ

6 फलाट, 5 पिट लाईन्स, 6 स्टेबलिंग लाईन्स

10

विरार

25 स्टेबलिंग लाईन्स

11

डहाणू रोड

11 स्टेबलिंग लाईन्स

12

मिरा रोड

25 स्टेबलिंग लाईन्स


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील रेल्वे सेवेची क्षमता सुधारण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP)-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP-III) आणि 33,690 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP-IIIA) या प्रकल्पांना मंजुरी दिली गेली  या प्रकल्पांतर्गत मुंबई उपनगरीय क्षेत्रात खाली नमूद कामे समाविष्ट आहेत:

 

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

खर्च (कोटी ₹)

1

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला 5 वी आणि 6 वी मार्गिका (MUTP-II) (17.5 किमी)

891

2

मुंबई सेंट्रल-बोरीवली 6 वी मार्गिका (MUTP-II) (30 किमी)

919

3

हार्बर लाईनवरील गोरेगाव ते बोरीवली मार्गाचा विस्तार (MUTP-IIIA) (7 किमी)

826

4

बोरीवली-विरार 5 वी आणि 6 वी मार्गिका (MUTP-IIIA) (26 किमी)

2,184

5

विरार-डहाणू रोड 3 री आणि 4 थी मार्गिका (MUTP-III) (64 किमी)

3,587

6

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (MUTP-III) (29.6 किमी)

2,782

7

ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (MUTP-III) (3.3 किमी)

476

8

कल्याण-आसनगाव 4 थी मार्गिका (MUTP-IIIA) (32 किमी)

1,759

9

कल्याण-बदलापूर 3 री आणि 4 थी मार्गिका (MUTP-IIIA) (14 किमी)

1,510

10

कल्याण-कसारा 3 री मार्गिका (67 किमी)

793

11

नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड मार्गिका (6 किमी)

176

12

निळजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिका (5 किमी)

338

13

कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेचे काम

866


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-III आणि IIIA अंतर्गत दरवाजांची सुविधा असलेल्या प्रत्येकी 12 डब्यांच्या 238 गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 19,293 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
 

रेल्वे सेवे दरम्यान होणाऱ्या मृत्यूंची राज्यनिहाय संख्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेद्वार (NCRB) द्वारे त्यांच्या भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या  (ADSI) या त्यांच्या प्रकाशनात प्रसिद्ध केली जाते. मात्र, मुंबई - उपनगरीय रेल्वे सेवेवरील मृत्यूंची संख्या स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जात नाही. भारतीय रेल्वे सेवेअंतर्गत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांत हाती घेतलेल्या विविध सुरक्षा विषयक उपाययोजनांमुळे, अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.


खाली दिलेल्या तक्त्यात मांडल्याप्रमाणे गंभीर रेल्वे अपघातांच्या संख्येत घट झाली आहे :
 

वर्ष

गंभीर अपघात

2014-15

135

2025-26 (28.02.2026 पर्यंत)

14 (90% ने कमी)

 

 

रेल्वे कारभारात सुरक्षिततेत सुधारणा दर्शवणारा आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे गंभीर अपघात निर्देशांकाचे (सीएआय) तपशील पुढीलप्रमाणे आहेत:-

 

सीएआय: -

वर्ष

अपघात निर्देशांक

2014-15

0.11

2024-25

0.03 (73% lesser)

 

 

कवच आवृत्ती 4.0 ची विस्तृत चाचणी पूर्ण झाल्यानंतर, ते यशस्वीपणे 1452 मार्ग किलोमीटरवर सुरू करण्यात आले आहे. यात दिल्ली–मुंबई आणि दिल्ली–हावडा हे जास्त गाड्या धावणारे मार्ग समाविष्ट आहेत.                                                                          

क्रमांक

विभाग

प्रगती (मार्ग किमी)

(1)

दिल्ली–मुंबई मार्ग:

i

·         जंक्शन केबिन – पलवल – मथुरा – नागदा विभाग

667

ii

·         वडोदरा – अहमदाबाद विभाग

96

iii

·         वडोदरा – विरार विभाग

336

(2)

दिल्ली–हावडा मार्ग:

i

·         गया – सरमातनर विभाग

93

ii

·         छोटा अंबाना – बर्दवान – हावडा विभाग

260

 

 

28.02.26 रोजीच्या स्थितीनुसार, दिल्ली–मुंबई आणि दिल्ली–हावडा या जास्त वर्दळीच्या मार्गांवरील कवच योजनेतील महत्त्वाच्या बाबींची प्रगती पुढीलप्रमाणे आहे:

S.No

घटक (Item)

प्रगती (Progress)

i

ऑप्टिकल फायबर केबल टाकणे

8570 Km

ii

दूरसंचार टॉवर्स बसवणे

1100 nos

iii

स्टेशन डेटा सेंटर

767 Station

iv

ट्रॅक साइड उपकरण बसवणे

6776 RKm

v

लोकोमध्ये कवचची तरतूद

4154 nos

 

 

 

 

 

 

 

 

रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली.

 
***

नेहा कुलकर्णी / तुषार पवार / प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर

*** 

 

 

 

 

 


(Release ID: 2239851) अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein: English