ऊर्जा मंत्रालय
इंडिया एनर्जी स्टॅकचे घटक
Posted On:
09 MAR 2026 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
ऊर्जा यंत्रणेशी संबंधित विविध घटक मानक कार्यपद्धतीअंतर्गत परस्परांशी सुरक्षितपणे जोडले जातील आणि संवाद साधू शकतील अशा पद्धतीचा संपूर्ण ऊर्जा क्षेत्रासाठीचा एक डिजिटल बृहत् आराखडा म्हणून इंडिया एनर्जी स्टॅक कल्पना मांडली गेली आहे. ऊर्जा मंत्रालयाने या इंडिया एनर्जी स्टॅकचा आराखडा, त्याचे घटक आणि डिझाईनसंबंधीत मार्गदर्शक आराखड्याची निश्चिती करण्यासाठी या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि विविध मंत्रालये, राज्य उपयोगिता संस्था, नियामक, वीज निर्मिती कंपन्या आणि पारेषण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह सर्व भागधारकांचा समावेश असलेल्या कृतीदलाची स्थापना केली आहे.
परस्पर समन्वित कार्यान्वयनाचे मार्ग खुले करत, ऊर्जा क्षेत्रातील संपूर्व मूल्य साखळीअंतर्गत माहितीसाठा, सेवा आणि व्यवस्था सुरळीरित्या एकात्मिक पद्धतीने काम करू शकतील याची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियमावली आणि निकष निश्चित करता येतील अशी रितीने इंडिया एनर्जी स्टॅक कल्पना मांडली गेली आहे.
याअंतर्गतच्या प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मुंबई इथल्या वीज वितरण कंपन्यांची निवड करण्यात आली आहे आणि या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाची कालमर्यादा आर्थिक वर्ष 2026-27 अशी निश्चित करण्यात आली आहे.
इंडिया एनर्जी स्टॅकच्या विकासासाठी एकूण 51.3 कोटी रुपये निधीची तरतूद केली असून,त्यापैकी 3.88 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत.
ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237254)
अभ्यागत कक्ष : 8