रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीने पुणे स्थित यशदा येथे कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह 2026 चे केले आयोजन


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन

Posted On: 06 MAR 2026 6:47PM by PIB Mumbai

पुणे, 6 मार्च 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे दोन दिवसीय “कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह 2026” चे उद्घाटन केले.

उद्घाटन समारंभाला टी. कृष्णा प्रसाद; अण्णासाहेब एम. के. पाटील; वाय. बी. रामकृष्ण; आणि संजय गंजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आयसीएआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च (आयआयएमआर), वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) यांच्यात जैवऊर्जा आणि शाश्वत कृषी संसाधनांच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी हे उद्घाटन सत्राचे ठळक वैशिष्ट्य होते.

आपल्या मुख्य भाषणात, गडकरी यांनी भारताच्या ऊर्जा स्वातंत्र्य आणि शाश्वत अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवासात कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. भारताला ऊर्जेच्या बाबतीत "आत्मनिर्भर"  बनवण्याचे, देशाला ऊर्जा आयातदारावरून ऊर्जा निर्यातदार बनवण्याचा सरकारचा दृष्टिकोन त्यांनी अधोरेखित केला.

त्यांनी  नमूद केले की जैवइंधन क्षेत्रामध्ये भारताचे जीवाश्म इंधन आयात बिल लक्षणीयरीत्या कमी करण्याची, तसेच ग्रामीण भागात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे.   सीबीजी उत्पादनाची कार्यक्षमता आणि व्यावसायिक व्यवहार्यता वाढविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या क्षेत्राच्या भविष्याबद्दल आशावाद व्यक्त करताना, गडकरी म्हणाले की, कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा वाढता अवलंब भारताला स्वच्छ, हरित आणि अधिक स्वयंपूर्ण ऊर्जा परिसंस्था उभारण्यास मदत करेल, त्याच वेळी ग्रामीण समुदायांना सक्षम बनवेल. त्यांनी सीबीजीचा उल्लेख  केवळ पर्यायी इंधन म्हणून  नाही तर शाश्वत विकास आणि ग्रामीण समृद्धीचा एक प्रमुख आधारस्तंभ असा केला.

भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला बळकटी देण्यासाठी, चक्राकार अर्थव्यवस्थेच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण उपजीविका  सक्षम करण्याची  सीबीजीची अफाट क्षमता त्यांनी अधोरेखित केली.

आमचे सरकार देशासाठी एक शाश्वत आणि स्वयंपूर्ण  जैव-ऊर्जा परिसंस्था तयार करण्यासाठी नवोन्मेष , गुंतवणूक आणि धोरणात्मक सहाय्याला गती देण्यासाठी वचनबद्ध आहे असे ते म्हणाले.

सोनाली काकडे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2236080) अभ्यागत कक्ष : 81
Read this releasein: English