कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
बँक गैरव्यवहार प्रकरणी 30 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सीबीआयकडून अटक
Posted On:
27 FEB 2026 10:01PM by PIB Mumbai
मुंबई, 27 फेब्रुवारी 2026
केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) जवळपास तीन दशकांपासून फरार असलेल्या अनंत तांबिटकर या आरोपीला अटक केली.
सीबीआयने 1992 मध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (एसबीबीजे) मधील आर्थिक फसवणूकीप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. तपासाअंती 1996 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि सुनावणीनंतर न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवले होते.
या प्रकरणी बनावट आर्थिक व्यवहार आणि अन्य गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असलेला एक आरोपी अनंत तांबेडकर (उर्फ अनंत तांबिटकर) आरोपपत्र दाखल झाल्यानंतर फरार झाला आणि त्याला फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. जवळपास 30 वर्षे तो फरार होता.
तांत्रिक गुप्त माहिती आणि प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे त्याचा मुंबईतील ठावठिकाणा कळाला. त्यानंतर 26.02.2026 रोजी सीबीआयने त्याला अटक केली. त्याला अटक करुन कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233797)
अभ्यागत कक्ष : 62