दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीसीए महाराष्ट्र व गोवा परिमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

प्रविष्टि तिथि: 19 FEB 2026 9:12PM by PIB Mumbai

मुंबई , 19 फेब्रुवारी 2026

महाराष्ट्र व गोवा परिमंडळ,संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आदर व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना  पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमातून त्यांच्या नेतृत्वगुणांप्रती, प्रशासकीय कौशल्यांप्रती तसेच राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.

यावेळी  सीसीए, महाराष्ट्र व गोवा परिमंडळ , डॉ. सतीशचंद्र झा यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मजबूत व उत्कृष्ट  प्रशासनव्यवस्था उभी करण्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आढावा घेतला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी धोरणांचा, प्रभावी प्रशासनाचा, सशक्त आरमार उभारणी, तसेच न्याय व प्रजाहिताबाबतच्या त्यांच्या कटिबद्धतेचा विशेष उल्लेख केला. ही मूल्ये आजही समाजाला प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारलेल्या शौर्य, सचोटी, सुशासन व राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची आठवण करून देणारा ठरला.

सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

 


(रिलीज़ आईडी: 2230485) आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English