वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2026 ते 2047 पर्यंत भारत जागतिक अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व 26 ट्रिलियन डॉलरची भर घालणार : ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन 2026 मध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

‘फ्रजाइल फाइव’ पासून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला भारत जगाला स्थैर्य, विकास आणि विश्वास देत आहे: वाणिज्य मंत्री

एफटीएमध्ये शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित : पीयूष गोयल

Posted On: 18 FEB 2026 11:04PM by PIB Mumbai

मुंबई, 18 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबई येथे ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन (जीईसी) 2026 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी संबोधित करताना जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत भारत एक विश्वासार्ह व अपरिहार्य भागीदार म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट केले.

ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन 2026 मध्ये बोलताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले,“आता ते 2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 26 ट्रिलियन डॉलरची भर पडण्याची अपेक्षा आहे. ही वाढीची संधी इतिहासात अभूतपूर्व आहे आणि जगात इतर कुठेही अशी संधी पुन्हा मिळणे शक्य नाही. आर्थिक अलिप्ततेचा काळ आता संपला आहे. म्हणूनच आम्ही मजबूत भूमिकेतून आघाड्या उभारत आहोत, मैत्री अधिक दृढ करत आहोत आणि व्यापार करार अंतिम करत आहोत. चार वर्षांत नऊ करार करण्यात आले असून, पुढेही आणखी करार होतील.”

ते पुढे म्हणाले,“आमच्यासाठी मुक्त व्यापार करार म्हणजे भारताच्या भविष्यात भागीदारी करण्याचे आमंत्रण आहे. ही एक अशी यात्रा आहे, जी भारताला आजच्या जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून 2027–28 पर्यंत तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाईल आणि अखेरीस 2047 पर्यंत 30–35 ट्रिलियन डॉलरची विकसित राष्ट्राची अर्थव्यवस्था बनवेल. जगाला या कहाणीचा भाग व्हायचे आहे. आणि भारत खुला, विश्वासार्ह आणि सातत्याने प्रगती करणारा प्रामाणिकपणे पुढे येणाऱ्या प्रत्येक भागीदाराचे स्वागत करण्यास सज्ज आहे.”

परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन कौन्सिल (एफईसीसी) यांच्या वतीने आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन 2026 मध्ये जगभरातून वरिष्ठ मंत्रीस्तरीय आणि व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी झाले असून, मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज अशा आर्थिक सहकार्याच्या व्यावहारिक चौकटी तयार करण्यावर चर्चा होत आहे.

भारताने आतापर्यंत 39 विकसित देशांशी करार केले असल्याचा उल्लेख करत मंत्री गोयल यांनी या यशाचे श्रेय स्पष्ट व शिस्तबद्ध राष्ट्रीय उद्दिष्टांना दिले. ते म्हणाले, “भारताने 2022 पासून आतापर्यंत सुमारे चार वर्षांत नऊ करार पूर्ण केले आहेत. हे करार मजबूत भूमिकेतून, दोन्ही देशांसाठी‘विन-विन' परिस्थितीच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. विश्वासामुळे आम्हाला आमचे संरक्षणात्मक हित जपता येतात आणि आक्रमक हित एकाच वेळी पुढे नेता येतात. भागीदार देशांनी भारताची भूमिका स्वीकारली आहे, कारण आम्ही आमच्या उद्दिष्टांबाबत प्रामाणिक आणि पारदर्शक राहिलो आहोत.”

पीयूष गोयल यांनी यावर भर देत सांगितले की या एफटीएमध्ये शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, एमएसएमईंच्या वाढीचे संरक्षण करताना, मच्छिमारांचे हित जपत आणि देशातील रोजगार सुरक्षित ठेवत, या एफटीएमुळे वस्त्र, पादत्राणे आणि लेदर क्षेत्रात बाजारपेठेपर्यंत पोहोच सुनिश्चित झाली आहे, औषधनिर्मिती क्षेत्रातील निर्यात वाढली आहे, शेती व समुद्री उत्पादनांच्या निर्यातीसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि तंत्रज्ञान व गुंतवणूक आकर्षित झाली आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2230034) अभ्यागत कक्ष : 62
Read this releasein: English