परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
पुणे येथील पारपत्र सेवा केंद्राच्या वतीने 21 फेब्रुवारीला तात्काळ अर्जदारांसाठी पारपत्र (पासपोर्ट) विशेष मोहीम
Posted On:
18 FEB 2026 8:04PM by PIB Mumbai
पुणे, 18 फेब्रुवारी 2026
पुणे येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने (आरपीओ) तात्काळ श्रेणीतील अर्जदारांसाठी पारपत्र (पासपोर्ट) विशेष मोहीम आयोजित केली आली आहे. ही मोहीम शनिवार, 21 फेब्रुवारी, 26 रोजी पुणे येथील पारपत्र सेवा केंद्र (पीएसके) येथे आयोजित केली जाईल.
परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने ‘पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट’ लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आणि तातडीचा प्रवास करण्याची गरज असलेल्या नागरिकांना लवकर पारपत्र मिळावे, यासाठी या सेवेचे वितरण सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
तात्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते आणि पात्रता मार्गदर्शक तत्त्वे कठोर आहेत. बरेच अर्जदार दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही निकषांमध्ये अपयशी ठरतात आणि त्यामुळे यशस्वीरित्या अर्ज सादर करू शकत नाहीत. अर्जदारांना ‘तात्काळ पारपत्र वितरणासाठी सल्ला’ आणि ‘तात्काळ सेवा उपक्रम’ यासंबंधीचे नियम काळजीपूर्वक वाचावेत आणि ‘अपॉइंटमेंट’ च्या दिवशी कोणत्याही संभाव्य समस्या टाळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि पात्रता निकष सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
तात्काळ अपात्र श्रेणींबद्दल जाणून घेण्यासाठी, कृपया https://www.passportindia.gov.in/psp/ TatkaalPassports या संकेतस्थळाला भेट द्यावी.
[अर्जदाराची खरी ओळख तपासण्यासाठी, पारपत्र कायदा 1967 च्या कलम 5 आणि पारपत्र नियम 1980 च्या नियम 5 मध्ये असे नमूद केले आहे की, पारपत्र प्राधिकारी यासंदर्भात सर्व चौकशी करू शकतात आणि अर्जाच्या योग्य निपटारासाठी पारपत्र प्राधिकारीवर्गाला आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता अर्जदाराला भासू शकते.]
तात्काळ विशेष मोहिमेसाठी आपली ‘अपॉइंटमेंट’ कशी ‘बुक’ करावी:
- पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport Seva App ला भेट द्या आणि तात्काळ योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.
- ऑनलाइन पैसे भरल्यानंतर, 'शेड्यूल अपॉइंटमेंट पेज' वर जा, 'PSK Pune' स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करावी.
टीप : ही मोहीम केवळ तात्काळ अपॉइंटमेंटसाठी आहे. सामान्य श्रेणीतील अर्ज किंवा ‘वॉक-इन’ ना परवानगी दिली जाणार नाही.
विशेष मोहिमेची तारीख आणि ठिकाणाची माहिती:
- तारीख: 21 फेब्रुवारी, 2026 (शनिवार)
- ठिकाण: झिरो वन,सर्व्हे क्र. 79/1, घोरपडी - मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्किडसमोर, मुंढवा, पुणे - 411036.
- वर्ग: फक्त तात्काळ अपॉइंटमेंट (नवीन आणि नूतनीकरण)
- वेळ: सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी हजर रहावे.)
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229979)
अभ्यागत कक्ष : 25