जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय भूजल मंडळामार्फत 'शाश्वत भूजल व्यवस्थापन आणि राष्ट्रीय जलस्तर मॅपिंग' या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा पुणे येथे संपन्न
Posted On:
17 FEB 2026 11:22PM by PIB Mumbai
पुणे, 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय भूजल मंडळ (CGWB), मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने आज पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) च्या सभागृहात “शाश्वत भूजल व्यवस्थापन सुनिश्चित करणे: राष्ट्रीय जलस्तर (Aquifer) मॅपिंगचे निष्कर्ष आणि डेटा प्रसार” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन यशदाचे अतिरिक्त महासंचालक श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे (GSDA) आयुक्त डॉ. विजय पाखमोडे आणि यशदाचे उपमहासंचालक व कुलसचिव श्री. सचिन कलंत्रे यांच्या हस्ते झाले.
केंद्रीय भूजल मंडळाचे (मध्य क्षेत्र, नागपूर) प्रादेशिक संचालक डॉ. उमेश एस. बलपांडे यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी त्यांनी शाश्वत भूजल व्यवस्थापनाचे महत्त्व आणि अचूक निर्णय प्रक्रियेसाठी जलस्तर डेटाच्या (Aquifer Data) प्रभावी प्रसाराची गरज अधोरेखित केली.
कार्यशाळेत तीन महत्त्वाच्या तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते:
सत्र 1: केंद्रीय भूजल मंडळाचे उपक्रम या सत्रात 'राष्ट्रीय जलस्तर मॅपिंग कार्यक्रम' (NAQUIM) १.० आणि २.० अंतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासाचे आणि डेटा प्रसार उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये खालील तज्ज्ञांनी तांत्रिक माहिती दिली:
•श्रीमती नीलोफर (शास्त्रज्ञ–डी): NAQUIM १.० अंतर्गत अभ्यास.
•सुश्री पौर्णिमा बराहाटे (शास्त्रज्ञ–डी): NAQUIM २.० अंतर्गत अभ्यास.
•श्री. एस. एस. पुर्ती (शास्त्रज्ञ–डी): पीआयबी (PIB) प्रकल्पांतर्गत उपक्रम.
•श्री. राकेश देवांगन (शास्त्रज्ञ–डी): महाराष्ट्रातील भूजलाची गुणवत्ता.
•श्री. निर्मल कुमार नंदा (शास्त्रज्ञ–सी): डेटा प्रसार उपक्रम.
सत्र 1: राज्य शासन आणि विविध विभागांचा सहभाग या सत्रात राज्य सरकारच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. यामध्ये जीएसडीएच्या (GSDA) उपसंचालक श्रीमती भाग्यश्री मग्गीरवार, राष्ट्रीय जल अकादमीचे (NWA) संचालक श्री. अंकित दुडेजा आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन्स सेंटरचे (MRSAC) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांचा समावेश होता.
सत्र 1: तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या सत्रात खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव मांडले.
•'ग्राफियास सोल्यूशन्स'चे डॉ. श्रीकांत गबाळे यांनी भूजल व्यवस्थापनासाठी जीआयएस (GIS) तंत्रज्ञान आणि एआय (AI) आधारित दृष्टिकोनावर सादरीकरण केले.
•'प्रिमोव्ह इन्फ्रास्ट्रक्चर'चे श्री. अजित फडणवीस यांनी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि संवर्धनावर मार्गदर्शन केले.
•बारामती जिल्ह्यातील करहाटी ग्रामपंचायतीचे 'जलमित्र' श्रीमती दीपाली हिरवे आणि श्री. गजानन लोणकर यांनी भूजल व्यवस्थापनातील लोकसहभागाचे महत्त्व सांगितले.
•'पाणी फाऊंडेशन'चे श्री. नामदेव नारनवरे आणि 'नाम फाऊंडेशन'चे श्री. राजाभाऊ शेळके यांनी जलसंधारणातील सार्वजनिक सहभागाबाबत माहिती दिली.
कार्यशाळेचा समारोप यशदाचे अतिरिक्त महासंचालक श्री. शेखर गायकवाड (आयएएस, निवृत्त) यांच्या भाषणाने झाला. समारोप सत्रात सहभागी सदस्य, विषय तज्ज्ञ आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. राज्यामध्ये भूजल संसाधनांच्या शाश्वत विकासासाठी संकलित केलेल्या माहितीचा (Data) प्रभावी वापर करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.


पीआयबी पुणे/हर्षल आकुदे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229418)
अभ्यागत कक्ष : 57