रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग-क्र.56 च्या धमासिया-बिटाडा/मोवी आणि नसरपूर-मालोठा विभागांत मानकांप्रमाणे चार-पदरी श्रेणीसुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने दिली मान्यता; याचा एकूण भांडवली खर्च होणार 4583.64 कोटी रुपये
Posted On:
14 FEB 2026 1:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक संसदीय समितीने काल गुजरातमधील धमासिया-बिटाडा/मोवी (47.46 किमी) आणि नसरपूर-मालोठा (60.21 किमी) या चार-पदरी रेल्वेमार्गांच्या एचएएम मोडवरील बांधकाम प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 107.67 किमी असून त्याचा एकूण भांडवली खर्च 4583.64 कोटी रुपये इतका येणार आहे.
हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग-क्र.56 चा एक भाग असून तो राजस्थान राज्यातील निंबाहेरा येथून सुरू होतो आणि गुजरातमधील दाहोद जिल्हा, मध्यप्रदेश राज्यातील अलिराजपूर जिल्हा या भागातून पुढे जात,नंतर छोटा उदेपूर जिल्ह्याजवळ गुजरातमध्ये पुन्हा प्रवेश करतो आणि वापीजवळ राष्ट्रीय महामार्ग-क्र.48 च्या जंक्शनवर संपतो.
मंजूर झालेल्या प्रकल्पाचे भाग नर्मदेच्या आकांक्षी जिल्ह्यातून जातात त्यामुळे दाहोद, छोटा उदेपूर, तापी आणि भरूच या आदिवासी भागांशी संपर्क सुधारेल ज्यामुळे या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला आणि सुधारणेला मदत होईल. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्ग-क्र.56 पासून सुमारे 11 किमी अंतरावर केवडिया गावात असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या प्रमुख राष्ट्रीय पर्यटन स्थळाशी येणारा संपर्क सुधारेल.
हा प्रकल्प 100 किमी/ताशी वेगाने जाता येईल यादृष्टीने डिझाइन केला आहे, ज्यामुळे सरासरी वेग 70 किमी/ताशी इतका वाढू शकेल ज्यामुळे प्रवासाचा वेळ 40% कमी होऊन तो - 2.5वरून 1.5 तासावर येईल.
मंजूर झालेल्या या 107.67 किमी लांबीच्या प्रकल्पामुळे सुमारे 19.38 लाख प्रत्यक्ष मनुष्यदिवसांचा रोजगार तयार होईल आणि 22.82 लाख मनुष्यदिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. प्रस्तावित मार्गाजवळील आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे या प्रकल्पामुळे रोजगाराच्या अतिरिक्त संधी देखील निर्माण होतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (NHAI) मार्फत, राष्ट्रीय महामार्ग-क्र.56 (175 किमी) च्या वर्दळीच्या जांबुगम (बोडेली)-मालोठा विभागाचे चार टप्प्यात चार-पदरी कॉन्फिगरेशनमध्ये अद्ययावतीकरण हाती घेतले आहे. जांबुगम (बोडेली) ते धामसिया आणि मोवी ते नसरपूर पर्यंतच्या भागांना आधीच मंजुरी देण्यात आली आहे आणि नोव्हेंबर 2025 मध्ये यांचे बांधकाम सुरू झाले असून ते येत्या 2 वर्षांत साध्य करायचे आहे आहे. प्रकल्पाचे टप्पे त्वरित पूर्ण झाल्यानंतर बोडेली ते मालोठा पर्यंत सतत चौपदरी दळणवळण प्रस्थापित होईल, ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-56 वरील गर्दी कमी होईल आणि राष्ट्रीय महामार्ग-53, राष्ट्रीय महामार्ग-48 आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गांचा (NE-4) संपर्क अधिक वाढेल.
राष्ट्रीय महामार्ग-56 वरील धमासिया-बिटाडा/मोवी (47.464 किमी) आणि नसरपूर-मल्होत्रा (60.21 किमी) साठी प्रकल्प संरेखन नकाशा

***
शैलेश पाटील/ संपदा पाटगावकर /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228419)
अभ्यागत कक्ष : 23