अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2024-25 साठी महाराष्ट्र शासनाचा वित्त लेखा आणि विनियोजन लेखा अहवाल

Posted On: 11 FEB 2026 4:01PM by PIB Mumbai

महाराष्ट्र शासनाचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचे वित्त लेखा आणि विनियोजन लेखा अहवाल 14 डिसेंबर 2025 रोजी राज्य विधिमंडळात मांडण्यात आला. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या देखरेखीखाली प्रधान महालेखापाल (ए अँड ई )-I, मुंबई द्वारे वार्षिक लेखे तयार केले जातात. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, पावत्यांसह वितरण आणि वित्तीय परिणाम याबाबतचा राज्याच्या आर्थिक स्थितीचा तपशीलवार अहवाल देतात.

प्रमुख ठळक मुद्दे:

  • महाराष्ट्र राज्याने या वर्षामध्‍ये 29,995 कोटी रूपयांची महसुली तूट नोंदवली आहे जी महसुली अधिशेषाचे उद्दिष्ट असलेल्या महाराष्ट्र आर्थिक उत्तरदायित्व आणि खर्च व्यवस्थापन  कायदा, 2005 अंतर्गत निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. दुसरीकडे, वित्तीय तूट 1,24,209 कोटी रूपये आहे जी 45,31,518 कोटी रूपयांच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (जीएसडीपी) 2.74% आहे.  ही तूट महाराष्ट्र आर्थिक उत्तरदायित्व आणि खर्च व्यवस्थापन कायद्यानुसार 5.2% च्या अनुज्ञेय मर्यादेत आहे. यामुळे वित्तीय शिस्त सुनिश्चित होते.
  • राज्याच्या सार्वजनिक कर्जात मागील वर्षाच्या तुलनेत 16.69% वाढ झाली असून कर्जाची रक्कम 2023-24 मधील 6,10,131 कोटी रु. वरून 2024-25 मध्ये 7,11,960 कोटी रु. वर पोहोचली आहे. कर्जाच्या रकमेत वाढ होऊनही, कर्जफेडीसाठी सार्वजनिक कर्ज पावत्यांच्या वापराचे प्रमाण कमी होत असून ते 2023-24 मधील 64%वरून 2024-25 मध्ये 61% पर्यंत कमी झाले आहे, यातून कर्ज व्यवस्थापनात सुधारणा झाल्याचे दिसते.
  • 31 मार्च 2025 अखेरपर्यंत, सर्व पर्सनल डिपॉझिट (पीडी) खात्यांमधील शिल्लक रक्कम 16,676 कोटी रु. होती. एकंदर 1,174 पीडी खात्यांपैकी 328 खात्यांची पडताळणी प्रमाणपत्रे कोषागार अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर त्याबाबत तडजोडीने मार्ग काढला गेला आहे.
  • उत्पन्न आणि खर्चाच्या बाबतीत, या वर्षातील एकूण उत्पन्न 6,06,809 कोटी रु. होते. त्यापैकी 4,81,906 कोटी रु. महसूलातून प्राप्त झाले, त्यामध्ये केंद्र सरकारच्या कर आणि शुल्काच्या उत्पन्नातील वाट्याच्या 71,350 कोटी रु.चा समावेश होता. उर्वरित 1,24,903 कोटी रु. भांडवली उत्पन्नातून प्रामुख्याने कर्जांमधून मिळाले. 
  • खर्चाच्या बाबतीत, एकूण 6,06,809 कोटी रु. रक्कम खर्चापोटी वितरित करण्यात आली त्यामध्ये 5,11,901 कोटी रु. महसूली खर्च आणि ₹82,773 कोटी भांडवली खर्चाच्या रकमेचा समावेश होता.
  • कर्ज आणि उधारीच्या बाबतीत, राज्याने एकूण 2,95,140 कोटी रु.चा निधी उभा केला आहे, त्यामध्ये 1,30,849 कोटी रु. अंतर्गत कर्ज आणि भारत सरकारकडून घेतलेल्या 12,786 कोटी रु. कर्जाचा तसेच इतर दायित्वांमधून घेतलेल्या 1,51,505 कोटींचा यांचा समावेश आहे. 
  • त्याचवेळी, राज्याने 1,68,545 कोटी रु. कर्जाची परतफेड केली आहे, त्यामध्ये अंतर्गत कर्जाच्या 40,440 कोटी रु. तर भारत सरकारकडून घेतलेल्या कर्जाच्या 1,366 कोटी रु. तसेच ₹1,26,739 कोटी इतर स्रोतांद्वारे घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या रकमेचा समावेश आहे.

 

अधिक तपशील येथे पहा: https://cag.gov.in/uploads/media/Press-Brief-2024-25-069439b9a656fc2-03902561.pdf 

***

NitinFulluke / BhaktiSontakke / ManjiriGanoo / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226806) अभ्यागत कक्ष : 58
Read this releasein: English