अणुऊर्जा विभाग
एनपीसीआयएलच्या रावतभाटा येथील स्वदेशी 700 मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वाटर रिएक्टर (PHWR) ने गाठली पूर्ण क्षमता
राष्ट्रीय अणुऊर्जा क्षमतेच्या विस्तारासोबतच RAPP-8 कार्यान्वित करण्याच्या हालचालीनाही वेग
Posted On:
11 FEB 2026 9:25PM by PIB Mumbai
मुंबई, 11 फेब्रुवारी 2026
अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB) निश्चित केलेल्या सर्व आवश्यक परवानग्यांचे यशस्वीरित्या पालन केल्यानंतर एनपीसीआयएलच्या राजस्थानमधील रावतभाटा येथील युनिट्सनी आज सकाळी 05:15 वाजता त्यांचे रेटेड पॉवर ऑपरेशन साध्य केले.
RAPS-7 हा देशात स्थापन होणाऱ्या सोळा स्वदेशी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स (PHWRs) पैकी 700 मेगावॅट मालिकेतील तिसरा रिअॅक्टरआहे.700 मेगावॅट PHWR मध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट असून ती जागतिक स्तरावर सर्वात सुरक्षित अणुभट्टी डिझाइनपैकी एक आहेत.

RAPP-7 द्वारे रेटेड पॉवरची यशस्वी कामगिरी एनपीसीआयएलच्या स्वदेशी 700 मेगावॅट PHWR डिझाइनच्या मजबुतीला दुजोरा देते आणि जटिल अणुऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये एनपीसीआयएल आणि भारतीय उद्योगाच्या मजबूत क्षमता अधोरेखित करते. दरम्यान,हॉट कंडिशनिंग पूर्ण झाल्यानंतर RAPP-8 चे लाईट वॉटर कमिशनिंग सध्या प्रगतीपथावर आहे.
स्वदेशी 700 मेगावॅट PHWR फ्लीट केंद्र सरकारच्या अणुऊर्जा मोहिमेअंतर्गत 2047 पर्यंत लक्ष्यित 100गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. हा 700 मेगावॅट रिअॅक्टर दरवर्षी 85% प्लांट लोड फॅक्टरवर अंदाजे 5.2 अब्ज युनिट स्वच्छ वीज निर्मिती करतो, ज्यामुळे दरवर्षी सुमारे 4.5 दशलक्ष टन इतके कार्बन उत्सर्जन टाळण्यास मदत होते.
सध्या, एनपीसीआयएल 24 रिअॅक्टर चालवते (RAPS-1 वगळता) ज्यांची एकूण स्थापित क्षमता 8,780 मेगावॅट आहे. याव्यतिरिक्त, 13,100 मेगावॅटचे एकत्रित अणुऊर्जा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2226731)
अभ्यागत कक्ष : 70