रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील वंदे भारत गाड्या

Posted On: 11 FEB 2026 9:15PM by PIB Mumbai

मुंबई, 11 फेब्रुवारी  2026

 

रेल्वे सेवेचे जाळे राज्यांच्या परस्पर सीमांपलिकडे विस्तारलेले आहे, अशावेळी या व्यवस्थेच्या गरजेनुसार या परस्पर राज्यांमधून गाड्यांची सेवा सुरू केल्या जाते. गाडी सुटण्याचे ठिकाण अथवा त्या गाडीच्या अखेरच्या थांब्याच्या आधारे, 24 वंदे भारत एक्सप्रेस सेवा महाराष्ट्र राज्यातील विविध स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत, तर 10 वंदे भारत एक्सप्रेस सेवा (11.11.2025 पासून सुरू झालेल्या 26505/26506 खजुराहो-बनारस वंदे भारत एक्सप्रेससह) मध्य प्रदेश राज्यातील विविध स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. त्यांची यादी खाली दिलेल्या तक्त्यांत मांडली आहे:

महाराष्ट्राला सेवा देणाऱ्या वंदे भारत गाड्या :

अनुक्रमांक

गाडी क्रमांक आणि नाव

वारंवारता

1

26101/26102 पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

2

20101/20102 नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

3

20669/20670 हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 3 दिवस

4

20673/20674 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 3 दिवस

5

22961/22962 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

6

20705/20706 हजूर  साहेब नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

7

22229/22230 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

8

20911/20912 इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

9

22223/22224 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

10

22225/22226 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

11

20825/20826 बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

12

20901/20902 मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

 

मध्य प्रदेशला सेवा देणाऱ्या वंदे भारत गाड्या:

अनुक्रमांक गाडी क्रमांक आणि नाव वारंवारता

1

20171/20172 राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

2

20173/20174 राणी कमलापती-रीवा वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

3

20911/20912 इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

4

22469/22470 खजुराहो-हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस

आठवड्यातून 6 दिवस

5

26505/26506 खजुराहो-बनारस वंदे भारत एक्सप्रेस (11.11.2025 पासून सुरू)

आठवड्यातून 6 दिवस

 

या वंदे भारत गाड्यांमुळे प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सिकंदराबाद, प्रयागराज, बनारस, भोपाळ, उज्जैन, इंदूर, जबलपूर, खजुराहो, मैहर, रीवा इत्यादी प्रमुख ठिकाणांना दळणवळणीय जोडणी उपलब्ध झाली आहे, तसेच या सेवांच्या माध्यमातून यात्रेकरू तसेच पर्यटकांच्या गरजा देखील पूर्ण केल्या जात आहेत.

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) प्रवाशांना अधिक वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी संबंधित महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रादेशिक आणि स्थानिक खाद्यपदार्थ सुरू केले आहेत. यामध्ये पनीर कोल्हापुरी, मुर्ग कोल्हापुरी, कोबीची भाजी, बटाटा मटार भाजी, बटाटा पोहे, कांदा पोहे, इंदोरी पोहे, शेव टमाटर भाजी, ओव्याचा पराठा, नाचणीची भाकरी, पात्रा भगर, खोया चिकन, रागी थेपला, मसालेदार कमळ देठांचा पदार्थ,  इत्यादी प्रादेशिक आणि स्थानिक पदार्थांचा समावेश आहे.

असे प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील खाद्यपदार्थ देण्याची सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांना अस्सल स्थानिक चवींचा आनंद घेण्याची आणि स्थानिक संस्कृतीशी जोडून घेण्याची संधी मिळाली आहे.

रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226725) अभ्यागत कक्ष : 73
Read this releasein: English