रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाबाबत ताजी माहिती

Posted On: 11 FEB 2026 9:00PM by PIB Mumbai

मुंबई, 11 फेब्रुवारी  2026

 

सध्या, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पावर  (508  किमी) जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने काम सुरु आहे. हा प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये तसेच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जात आहे ज्यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे 12 स्थानके नियोजित आहेत.

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पासाठी संपूर्ण जमीन (1389.5 हेक्टर) संपादित करण्यात आली आहे. सर्व वैधानिक मंजुरी मिळाल्या आहेत. सर्व 1651 सेवा-सुविधा  स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात भूसंपादनाला झालेल्या विलंबाचा प्रकल्पावर 2021 पर्यंत परिणाम झाला आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रात  भूसंपादनाला वेग आला.

विविध प्रमुख बाबींची आतापर्यंतची  प्रगती खालीलप्रमाणे आहे:

गुजरात :

तपशील

प्रगती
फाउंडेशन

352 किमी

पिअर्स

352 किमी

गर्डर कास्टिंग

342 किमी

गर्डर लाँचिंग

331 किमी

ट्रॅक बेड बांधकाम

152 किमी

ओएचई मास्टची उभारणी

121 किमी

महाराष्ट्र:

तपशील

प्रगती
फाउंडेशन

74 किमी

पिअर्स

65 किमी

गर्डर कास्टिंग

9 किमी

गर्डर लाँचिंग

3 किमी


एकूण 12 स्थानकांपैकी  8 स्थानकांवर (वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, आणंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती) फाउंडेशनचे  काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र विभागात, 3 स्थानकांवर (ठाणे, विरार, बोईसर) फाउंडेशनचे  काम सुरू आहे आणि बीकेसी स्थानकावर खोदकाम जवळपास पूर्ण होत  आले आहे आणि बेस स्लॅब टाकण्यास सुरुवात झाली आहे.

17 नदी  पूल पूर्ण झाले आहेत. गुजरातमधील 4  प्रमुख नदयांवरील  (नर्मदा, माही, ताप्ती आणि साबरमती) पुलांसाठी काम प्रगतीपथावर  आहे आणि महाराष्ट्रातील  4 नदी पुलांवर काम सुरू आहे. डेपोसंबंधी  (ठाणे, सुरत आणि साबरमती) काम  वेगाने सुरू आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील बांधकाम समाधानकारकपणे सुरू आहे. 91% खोदकाम झाले आहे आणि काँक्रिटीकरणाचे काम विविध टप्प्यांवर आहे, लेव्हल-4 वरील बेसमेंट स्लॅबचे काम   100% पूर्ण झाले आहे. समुद्राखालील बोगद्याचे (अंदाजे 21किमी) काम सुरू झाले आहे, त्यापैकी महाराष्ट्रातील घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा 4.8 किमीचा बोगदा पूर्ण झाला आहे.

MAHSR प्रकल्पाद्वारे , विशेषतः ट्रॅक बांधणे, प्रगत सिग्नलिंग प्रणाली, रोलिंग स्टॉक उत्पादन आणि देखभाल, प्रकल्प व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात मिळणारा अनुभव आणि तांत्रिक क्षमता,  देशातील भविष्यातील हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी एक भक्कम  पाया प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. अशा कौशल्य प्राप्तीसह, भारत HSR क्षेत्रात नियोजन आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत आपले स्थान मजबूत करेल.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या अनुषंगाने, भारतीय रेल्वे आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी हाय-स्पीड रेल्वे प्रणाली आणि घटकांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. वंदे भारतच्या यशानंतर, इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मेसर्स भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) च्या सहकार्याने ताशी 280 किमी वेग असलेल्या हाय-स्पीड ट्रेन सेटची रचना आणि निर्मिती करत आहे.

प्रकल्पासाठी भूसंपादन लागू कायद्यांनुसार केले गेले आहे आणि भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसनात उचित भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कायदा आणि संबंधित राज्य धोरणांनुसार बाधित व्यक्तींना भरपाई देण्यात आली आहे. राज्य सरकारांच्या समन्वयाने अतिरिक्त लाभ आणि भत्त्यासह पुनर्वसन आणि पुनर्वसाहती संबंधी  उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

MAHSR कॉरिडॉर हा उच्च-फ्रिक्वेन्सी ऑपरेशन्ससाठी डिझाइन केला आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

विद्यमान रेल्वे/विमान प्रवास पर्यायांच्या तुलनेत तिकिटांची किंमत स्पर्धात्मक ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

प्रकल्पाच्या व्यवहार्यत्याचे  दीर्घकालीन आधारावर मूल्यांकन करण्यात आले  आहे, ज्यामध्ये अंदाजे प्रवाशांची  मागणी, आर्थिक लाभ , वेळेची बचत आणि प्रादेशिक विकास याकडे लक्ष देण्यात आले  आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. उच्च स्तरीय सुरक्षा आणि त्याच्याशी संबंधित देखभाल प्रोटोकॉल लक्षात घेऊन  बुलेट ट्रेन प्रकल्प जपानी रेल्वेच्या मदतीने डिझाइन करण्यात आला आहे. भारतीय गरजा आणि हवामान परिस्थितीनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत. नागरी संरचना, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग, दूरसंचार आणि ट्रेनसेट्सच्या पुरवठ्याशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची मुदत निश्चित करण्यात येईल.

रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226722) अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein: English