रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रेल्वेविषयक तक्रारींचा होणार निपटारा

Posted On: 11 FEB 2026 8:41PM by PIB Mumbai

मुंबई, 11 फेब्रुवारी  2026

 

प्रवाशांना सुखकर आणि  सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी रेल्वेतर्फे पायाभूत सुविधा व देखभालीची कामे वेळोवेळी हाती घेतली जातात. अशा कामांसाठी काही वेळा काही रेल्वेसेवा पूर्ण किंवा अंशतः रद्द केल्या जाऊ शकतात तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलणे गरजेचे असते. त्याप्रमाणे, वर्ष 2025-26 मध्ये हिंगोली डेक्कन स्थानकावरून जाणाऱ्या काही रेल्वेफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि  काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. अर्थातच सर्व दुरुस्तीकामे संपल्यावर या सर्व सेवा पुन्हा सुरळीत होतात. 

हिंगोली डेक्कन स्थानकावर नागपूर, पुणे, मुंबई, जयपूर, हजूर साहिब नांदेड , तिरुपती, काचीगुडा, डॉ आंबेडकर नगर ( महू) या स्थानकांशी संपर्क करणाऱ्या 38  रेल्वेगाड्या येतात. 

S.N.

Train No. & Name

1

11403/04 Nagpur - SCSM (T) Kolhapur Express

2

11405/06 Pune - Amravati Express

3

12071/72 Mumbai CSMT - Hingoli Deccan Jan Shatabdi Express

4

12421/22 Hazur Sahib Nanded - Amritsar Express

5

12439/40 Hazur Sahib Nanded - Shri Ganganagar Express

6

12485/86 Hazur Sahib Nanded - Shri Ganganagar Express

7

12719/20 Jaipur - Hyderabad Express

8

12751/52 Hazur Sahib Nanded - Jammu Tawi Humsafar Express

9

12765/66 Tirupati - Amravati Express

10

17605/06 Kacheguda - Bhagat Ki Kothi Express

11

17639/40 Kacheguda - Akola Express

12

17641/42 Kacheguda - Narkher Express

13

17683/84 Akola -Purna Express

14

19301/02 Dr. Ambedkar Nagar (Mhow) - Yesvantpur Express

15

19713/14 Jaipur - Kurnool City Express

16

22709/10 Hazur Sahib Nanded - Amb Andaura Express

17

22723/24 Hazur Sahib Nanded - Shri Ganganagar Express

18

57655 Parli Vaijnath–Akola Passenger

19

57656 Akola-Purna Passenger

20

77613 Purna–Akola DEMU

21

77614 Akola-Parli Vaijnath DEMU

 

स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या, गाडीचे वेळापत्रक आणि अतिरिक्त वेळेची उपलब्धता, फलाटाची लांबी, इत्यादी अनेक मुद्द्यांचा विचार करून 

गाडीचा थांबा घेणे शक्य आहे की नाही, हे ठरवले जाते. 

अमृत भारत स्थानक योजना 

स्थानकांवर अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत दीर्घकालीन नियोजनातून स्थानकांचा पुनर्विकास सुरु केला आहे. स्थानकांच्या सुधारणांसाठी मास्टर प्लॅन तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाते. 

मूळ आराखड्यामध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्‍यावर भर देण्‍यात येतो:

  • स्थानक आणि आजूबाजूच्या भागात प्रवेश करण्‍यासाठी सुविधा करणे
  • शहराच्या दोन्ही भागांना जोडण्याची व्यवस्था  
  • स्थानकाच्या इमारतीत सुधारणा 
  • प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा,इ मध्ये सुधारणा 
  • प्रवाशांच्या रहदारीला अनुरूप रुंद पादचारी पूल 
  • उद्वाहन, एस्कलेटर अथवा रॅम्पची व्यवस्था 
  • दिव्यांगजनांसाठी सुविधा 
  • प्रवाशांना माहिती देण्याची सुधारित सुविधा 

हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर, हिंगोली डेक्कन आणि  किनवट स्थानकांसहित 132 स्थानके महाराष्ट्रात आहेत, विकासासाठी निवडलेल्या  स्थानकांची यादी खालीलप्रमाणे आहे : 

State

No. of Stations

Name of Stations

Maharashtra

132

Ahmednagar, Ajni (Nagpur), Akalkot Road, Akola, Akurdi, Amalner, Amgaon, Amravati, Andheri, Badnera, Balharshah, Bandra Terminus, Baramati, Belapur, Bhandara Road, Bhokar, Bhusawal, Borivali, Byculla, Chalisgaon, Chanda Fort, Chandrapur, Charni Road, Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Chinchpokli, Chinchwad, Dadar (CR), Dadar (WR), Dahisar, Daund, Dehu Road, Devlali, Dhamangaon, Dharangaon, Dharashiv, Dharmabad, Dhule, Diva, Dudhani, Gangakher, Godhani, Gondia, Grant Road, Hadapsar, Hatkanangale, Hazur Sahib Nanded, Himayatnagar, Hinganghat, Hingoli Deccan, Igatpuri, Jalgaon, Jalna, Jeur, Jogeshwari, Kalyan Jn, Kamptee, Kandivali, Kanjur Marg, Karad, Katol, Kedgaon, Kinwat, Kopargaon, Kurduwadi Jn, Kurla Jn, Lasalgaon, Latur, Lokmanya Tilak Terminus, Lonand Jn, Lonavla, Lower Parel, Malad, Malkapur, Manmad Jn, Manwath Road, Marine Lines, Matunga, Miraj Jn, Mudkhed Jn, Mumbai Central, Mumbra, Murtizapur Jn, Nagarsol, Nagpur Jn, Nandgaon, Nandura, Nandurbar, Narkher Jn, Nashik Road, Netaji Subhash Chandra Bose Itwari Junction, Pachora Jn, Palghar, Pandharpur, Panvel Jn, Parbhani Jn, Parel, Parli Vaijnath, Partur, Phaltan, Prabhadevi, Pulgaon Jn, Pune Jn, Purna Jn, Raver, Rotegaon, Sainagar Shirdi, Sandhurst Road, Sangli, Satara, Savda, Selu, Sewagram, Shahad, Shegaon, Shivaji Nagar Pune, Shri Chhatrapati Shahu Maharaj Terminus Kolhapur, Solapur, Talegaon, Thakurli, Thane, Titvala, Tumsar Road, Umri, Uruli, Vadala Road, Vidyavihar, Vikhroli, Wadsa, Wardha, Washim, Wathar

 

  • हिमायतनगर स्थानक : स्थानक इमारत, पोर्च, प्लॅटफॉर्म निवारा, प्लॅटफॉर्म पृष्ठभागाची सुधारणा, प्रतीक्षालय, शौचालय, परिभ्रमण क्षेत्र आणि लिफ्टची सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.
  • हिंगोली डेक्कन स्थानक: प्लॅटफॉर्म क्रमांक 2 चा  प्लॅटफॉर्म निवारा आणि प्लॅटफॉर्म पृष्ठभागाची सुधारणा कामे पूर्ण झाली आहेत. नवीन स्थानक इमारत, विद्यमान स्थानक इमारतीची सुधारणा, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या प्लॅटफॉर्म पृष्ठभागाची सुधारणा, परिभ्रमण क्षेत्र, उद्वाहनआणि 12 मीटर पादचारी पुलाची  कामे हाती घेण्यात आली आहेत.
  • किनवट स्थानक: स्थानक इमारत, पोर्च, प्लॅटफॉर्म निवारा, प्लॅटफॉर्म पृष्ठभागाची सुधारणा, प्रतीक्षालय, शौचालय, परिभ्रमण क्षेत्र, उद्वाहन आणि 12 मीटर पादचारी पुलाची  सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.
  • वाशिम स्थानक: स्थानक इमारत, पोर्च, प्लॅटफॉर्मची सुधारणा, प्लॅटफॉर्म निवारा, प्रतीक्षालयाची सुधारणा, शौचालय, परिभ्रमण क्षेत्र, उद्वाहन आणि 12 मीटर पादचारी पुलाची  सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.
  • मानवत रोड स्थानक: प्लॅटफॉर्म निवारा काम पूर्ण झाले आहे. स्थानक इमारत, प्रवेशद्वार पोर्च, प्लॅटफॉर्म पृष्ठभाग, प्रतीक्षा कक्ष, शौचालय आणि उद्वाहन  यांच्या सुधारणांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

रेल्वेने वापरलेल्या सुधारित देखभाल पद्धती, तांत्रिक सुधारणा, चांगल्या पायाभूत सुविधा आणि रोलिंग स्टॉक इत्यादी , तसेच  सुरक्षिततेशी संबंधित कामांची माहिती खाली दिली आहे:-

SN

Item

2004-05 to 2013-14

2014-15 to 2024-25

2014-25 Vs. 2004-14

 

Technological Improvements

1.

Use of high-quality rails(60 Kg) (Km)

57,450 Km

1.43 Lakh Km

More than 2 times

2.

Longer Rail Panels

(260m) (Km)

9,917 Km

77,522 Km

Nearly 8 times

3.

Electronic Interlocking (Stations)

837 Stations

3,691 Stations

More than 4 times

4.

Fog Pass Safety Devices (Nos.)

As on 31.03.14:

90 Nos.

As on 31.03.25: 25,939 Nos.

288 times

5.

Thick Web Switches (Nos.)

Nil

28,301 Nos.

 
 

Better Maintenance Practices

1.

Primary Rail Renewal (Track Km)

32,260 Km

49,941 Km

1.5 times

2.

USFD (Ultra Sonic Flaw detection) Testing of Welds (Nos.)

79.43 Lakh

2 Crore

More than 2 times

3.

Weld failures (Nos.)

In 2013-14: 3699 Nos.

In 2024-25:

370 Nos.

90 % reduction

4.

Rail fractures (Nos.)

In 2013-14: 2548 Nos.

In 2024-25:

289 Nos.

More than 88% reduction

 

Better Infrastructure and Rolling Stock

1.

New Track KM added (Track Km)

14,985 Km

34,428 Km

More than 2 times

2.

Flyovers (RoBs)/Underpasses (RUBs) (Nos.)

4,148 Nos.

13,808 Nos.

More than 3 times

3.

Unmanned Level crossings

(Nos.) on BG

As on 31.03.14:

8,948

As on 31.03.24:Nil

(All eliminated by 31.01.19)

Removed

4.

Manufacture of LHB Coaches (Nos.)

2,337 Nos.

42,677

More than 18 times

रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व  माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226713) अभ्यागत कक्ष : 50
Read this releasein: English