रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई एसी लोकल सेवा - परिचालन आणि क्षमता वाढीबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

Posted On: 11 FEB 2026 7:21PM by PIB Mumbai

मुंबई, 11 फेब्रुवारी 2026

 

प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, 01-02-2026 पर्यंत, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून एकूण 3,230 ईएमयू लोकल सेवा (एसी सेवांसह) चालवल्या जात आहेत. पश्चिम रेल्वे 1410 सेवा चालवते, त्यामध्ये 121 वातानुकूलित सेवांचा समावेश आहे. मध्य रेल्वे 1820 सेवा चालवते (94 एसी ईएमयूसह) त्यापैकी 614  सेवा (14 एसी ईएमयूसह) हार्बर मार्गावर चालवल्या जातात.

प्रवासी संख्या आणि भाडे:

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात एसी-ईएमयू गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये 30.44% वाढ झाली आहे.

उपनगरीय विभागांवर धावणाऱ्या  एसी सामान्य सेवांचे एकेरी प्रवासाच्या मूळ भाड्यात 05.05.2022 पासून सुमारे 50%इतकी लक्षणीय कपात  करण्यात आली  आहे.

मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी क्षमता वाढविण्याचे काम:

सध्या, मुंबई परिसरात दररोज सुमारे 120  मूळ मेल/एक्सप्रेस गाड्या आणि सुमारे 3200 उपनगरीय गाड्या चालवल्या जातात. क्षमता वाढवण्यासाठी आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी, भारतीय रेल्वेने खालील पावले उचलली आहेत:

मुंबई परिसरातील विविध स्थानकांवर रेल्वे वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी, विविध स्थानकांवर खालील कामे पूर्ण झाली आहेत / हाती घेण्यात आली आहेत/ नियोजन करण्यात आले आहे:

अनु क्र.

स्थानक

तपशील

1

वांद्रे टर्मिनस

3 पिट लाईन्स पूर्ण झाल्या आहेत

2

मुंबई सेंट्रल

24 एलएचबी कोचसाठी प्लॅटफॉर्म विस्तार

3

जोगेश्वरी

2 अतिरिक्त प्लॅटफॉर्म

4

दादर

1 अतिरिक्त प्लॅटफॉर्म

5

वसई रोड

6 प्लॅटफॉर्म, 3 पिट मार्गिका 5 स्टॅबलिंग लाईन्स

6

पनवेल-कळंबोली

5 प्लॅटफॉर्म , 4 पिट मार्गिका , 2 सिक लाईन्स

7

कल्याण

6 प्लॅटफॉर्म , 4 पिट मार्गिका

8

लोकमान्य टिळक

(T)

4 प्लॅटफॉर्म , 2 पिट मार्गिका

9

परळ

6 प्लॅटफॉर्म, 5 पिट मार्गिका, 6 स्टॅबलिंग मार्गिका

10

विरार

25 स्टॅबलिंग मार्गिका

11

डहाणू रोड

11 स्टॅबलिंग मार्गिका

12

मीरा रोड

25 स्टॅबलिंग मार्गिका

 

 

या व्यतिरिक्त,15 डब्यांच्या ईएमयूसाठी 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई उपनगरीय क्षेत्रात रेल्वे नेटवर्कची क्षमता सुधारण्यासाठी, 8,087  कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP)-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा MUTP-III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाचा MUTP-IIIA ला मंजुरी देण्यात आली  आहे. या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील खालील कामांचा समावेश आहे:

अनु क्र.

प्रकल्पाचे नाव

खर्च (कोटी रुपये)

1

सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका (एमयूटीपी-II) (17.5 किमी)

891

2

मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका (एमयूटीपी-II) (30 किमी)

919

3

गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्गिकेचा विस्तार (एमयूटीपी-IIIA) (7 किमी)

826

4

बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका (एमयूटीपी-IIIA) (26 किमी))

2,184

5

विरार-डहाणू रोड 3 री आणि 4 थी मार्गिका (MUTP-III) (64 किमी)

3,587

6

पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिका (MUTP-III) (29.6 किमी)

2,782

7

ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय मार्गिका लिंक (MUTP-III) (3.3 किमी)

476

8

कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका (MUTP-IIIA) (32 किमी)

1,759

9

कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका (MUTP-IIIA) (14 किमी)

1,510

10

कल्याण-कसारा तिसरी मार्गिका (67 किमी)

793

11

नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड मार्गिका (6 किमी)

176

12

निळजे -कोपर डबल कॉर्ड मार्ग (5 किमी)

338

13

कल्याण यार्डचे रीमॉडेलिंग काम

866

14

3री आणि 4थी मार्गिका बदलापूर - कर्जत (32.5 किमी)

1324

15

चौथी मार्गिका आसनगाव - कसारा (35 किमी)

794

प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी, MUTP-III आणि IIIA अंतर्गत 19,293 कोटी रुपये खर्चासह प्रत्येकी 12 डब्यांच्या  238 गाडयांना  मंजुरी देण्यात आली आहे. या गाड्यांच्या  खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याशिवाय, एसी ईएमयू सेवेचे संचालन ही एक निरंतर  प्रक्रिया आहे जी परिचालन व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता, वाहतूक समर्थन इत्यादींच्या अधीन आहे.

आगामी पावसाळ्याच्या तयारीसाठी, विभागीय रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करते. नियमित मोहिमेव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व मोहिमा देखील हाती घेतल्या जातात , ज्यामध्ये EMU/MEMU कोचमध्ये पाणी शिरू नये यावर विशेष भर दिला जातो.

त्यानुसार, खालील उपाययोजना विचारात घेतल्या जातात.

  • पावसाचे पाणी सहजरित्या वाहून जाण्यसाठी नाले/कल्व्हर्ट साफ करणे.
  • पाणी साचल्यामुळे ट्रॅक सर्किटमध्ये बिघाड होऊ नये म्हणून विशेष लक्ष देऊन पॉइंट्स आणि ट्रॅक सर्किटची संयुक्त तपासणी.
  • अडथळा आणि नुकसान टाळण्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि ओव्हरहेड उपकरणांजवळ लटकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे.
  • ट्रॅक आणि रेल्वे परिसरात पाणी साचू नये म्हणून सुधारात्मक उपाययोजना हाती घेण्यासाठी इतर एजन्सींशी समन्वय साधणे.
  • लोकल्स वेळेवर धावतील आणि एकाच जागी अडकणार नाहीत हे सुनिश्चित करणे 

 रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226611) अभ्यागत कक्ष : 54
Read this releasein: English