शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनआयटी गोवा यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील एआय/एमएलचे रहस्य उलगडण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 10 FEB 2026 4:10PM by PIB Mumbai

पणजी, 10 फेब्रुवारी 2026

एनआयटी गोवा यांच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी विविध शैक्षणिक अकादमींसाठी “एआय/एमएलचे रहस्य उलगडणे,(प्री-समिट वर्कशॉप-इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026)" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 हा एक प्रमुख जागतिक उपक्रम आहे; जो 16–20, फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे (MeitY) आयोजित केला जाणार आहे.

ग्लोबल साउथ देशांमध्ये अशा प्रकारची शिखर परिषद पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लक्ष कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) "संरक्षण" या विषयावरून "प्रभाव" आणि अंमलबजावणीकडे वळवले जाणार आहे. हे सर्वात मोठे जागतिक एआय संमेलन असेल, जे जबाबदार, सर्व समावेशक आणि प्रभावित करणाऱ्या - एआयला वास्तविक-जगातील अनुप्रयोगांमध्ये रूपांतरित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. तसेच ते प्रामुख्याने ग्लोबल साउथसाठी संशोधन आणि धोरणांमधील अंतर कमी करण्यावर भर देते.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने, एनआयटी गोवाने अल इम्पॅक्ट समिट 2026 (Al Impact Summit 2026) यांनी विविध अकादमींसाठी जागरूकता आणि सहभागाची देशव्यापी चळवळ उभारण्यासाठी या परिषदपूर्व कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिलीप ए डीन-आयआयटी धारवाड, उपस्थित होते तसेच एनआयटी गोवाचे संचालक प्रा. ओ. आर. जयस्वाल आणि एनआयटी गोवाच्या सीएसई विभागाच्या टी-एचओडी डॉ. वीणा हे ही यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत जीईसी गोवा, पीसीसीई गोवा, पारुल विद्यापीठ, आरआयटी गोवा तसेच डीटीई गोवा यासारख्या गोव्यातील विविध उच्च शैक्षणिक संस्थांमधील 150 हून अधिक सहभागी (शिक्षक आणि विद्यार्थी) उपस्थित होते.

या कार्यशाळेचा उद्देश सहभागींना 2047 पर्यंत आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारतासाठी एक महत्त्वाचे पाऊल-शैक्षणिक क्षेत्रातील एआय/एमएल बद्दल माहिती देणे हा होता, ज्यामध्ये  एआय/एमएल  क्षेत्रातील गरजा आणि संधी, उच्च शिक्षणासाठी  एआय/एमएल  संरेखित अभ्यासक्रम विकास,  एआय/एमएल  मधील संशोधन आणि नवोन्मेषाच्या संधी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सामाजिक वस्तूंसाठी एआयचा प्रभाव आणि अनुप्रयोग यांचा समावेश होता. 

भारताच्या कृत्रिम प्रज्ञा बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने एआय/एमएलच्या क्षेत्रात क्षमता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता, ज्यामध्ये शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या कार्यशाळेमुळे, सहभागींमधे एआय/एमएल क्षेत्रांतील गरजा आणि संधींची उत्कृष्ट समज विकसित केली असून त्यायोगे शाश्वत विकासाशी संबंधित विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रदेश तसेच राष्ट्रीय स्तरावर पुढील तांत्रिक योगदानासाठी प्रोत्साहन मिळेल.

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2225849) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English