नौवहन मंत्रालय
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची मुंबई बंदराला भेट, ईस्टर्न वॉटरफ्रंट परिवर्तन प्रकल्पांचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
06 FEB 2026 7:46PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार (आयएएस), आणि इतर मान्यवरांसह आज मुंबई बंदर प्राधिकरणाला भेट दिली. त्यांच्या या भेटीत बंदराची बोट फेरी आणि मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचे सागरी व्यवसाय आणि पर्यटन स्थळात परिवर्तन करण्याबाबत तपशीलवार सादरीकरण, याचा समावेश होता.
या भेटीदरम्यान अंमलबजावणी अंतर्गत असलेले प्रमुख प्रकल्प आणि भविष्यातील वाढीसाठी दोन प्रमुख उपायांवर चर्चा झाली.
1. कोअर पोर्ट ग्रोथ (बंदर विकास): जवाहर द्वीप आणि पिरपाऊ येथे कच्चे तेल, पीओएल, एलएनजी आणि रसायने यासारख्या द्रव पदार्थांचा समुद्रातील माल हाताळणीचा मोठ्या प्रमाणात विस्तार, तसेच घन बल्क ट्रान्स-शिपमेंटसाठी बाह्य बंदरात नांगरणी सुविधेचा विकास. मुंबई बंदराने 2047 पर्यंत दरवर्षी 150 दशलक्ष टन माल हाताळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जवाहर द्वीप येथे पुनर्ग्रहण आणि किनारा संरक्षण यासारखे पायाभूत सुविधा प्रकल्प, 22 एमटीपीए सहावे तेल बर्थ, आणि अतिरिक्त पुनर्ग्रहण, ही कामे या उद्दिष्टाच्या दिशेने महत्वाची पावले आहेत.
2. ईस्टर्न वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट (पूर्व किनारपट्टी विकास): क्रूझ पर्यटन, सागरी व्यवसाय, कौशल्य विकास आणि नील अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी वापरात नसलेल्या बंदरांच्या मालमत्तेचे परिवर्तन केले जात आहे. हा विकास सागरी अमृत काल व्हिजन 2047, क्रूझ भारत मिशन आणि नीती आयोगाच्या एमएमआर ग्रोथ हब प्लॅन तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसारख्या जागतिक मापदंडांना अनुसरून आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टने गेल्या वर्षी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू केले, ही भारतातील अशा प्रकारची सर्वात मोठी सुविधा आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई बंदर आता हायब्रीड ईपीसी + पीपीपी मोड अंतर्गत 887 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीसह पूर्व किनारपट्टीवर भारतातील पहिला आणि सर्वात मोठा जागतिक दर्जाचा विकसित भारत मुंबई मरीना प्रकल्प सुरू करत आहे. याच्या शेजारी उभारले जाणारे नमो भारत आंतरराष्ट्रीय सेलिंग स्कूल नौकानयन कौशल्ये आणि नागरिकांना पाण्याची सम-न्यायी उपलब्धता प्रदान करेल.
“काही आव्हाने खूपच चिंताजनक आहेत आणि ती आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत असल्याचे दिसते. या सर्व परिस्थितीतही मानवजातीने मानवी गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच हे जग एक चांगले स्थान बनवण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपायांचा लाभ घेत पुढे वाटचाल करत आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या भरपूर संधी आहेत,” असे ते म्हणाले.
एनआयटी गोव्याचे माजी विद्यार्थी आणि गोवा-स्थित 'ग्रोथ ग्रेव्ही' या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ग्रोथ मार्केटिंग आणि डिजिटल स्ट्रॅटेजी कंपनीचे संस्थापक वीरेश वझिराणी हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.
एनआयटी गोवाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बी. राजा गोपाल नायडू आणि एनआयटी गोवाचे संचालक प्रा. ओमप्रकाश आर. जयस्वाल यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य, सिनेटचे सदस्य, संस्थेच्या इतर शैक्षणिक आणि प्रशासकीय संस्थांचे सदस्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.
एनआयटी गोवा येथे पाच अभियांत्रिकी विभागांमध्ये पदवीपूर्व कार्यक्रम, तीन विषयांमध्ये एम.टेक आणि अभियांत्रिकी, उपयोजित विज्ञान, तंत्रज्ञान तसेच मानविकी आणि सामाजिक विज्ञान या विविध शाखांमध्ये पीएच.डी. पदवी कार्यक्रम उपलब्ध आहेत.
***
शैलेश पाटील/राजश्री पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2224757)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English