सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
गोपनीयता, मार्गदर्शन आणि विश्वास हे प्रभावी सर्वेक्षणाचे प्रमुख घटक आहेत: अमिताव साहा, डीडीजी, एनएसओ, कोलकाता
राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षणावर एनएसओ आयोजित एक दिवसीय विभागीय प्रशिक्षण शिबीर नागपूर येथे संपन्न
Posted On:
06 FEB 2026 4:11PM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO), नागपूर विभागीय कार्यालयाने, शुक्रवारी राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण (NHIS) यावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.या उपक्रमाचा उद्देश आगामी सर्वेक्षणाची प्रभावी आणि सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा आहे.हा कार्यक्रम नागपूर येथील इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (IBM) यांच्या सिव्हिल लाईन्स येथील परिसरात आयोजित करण्यात आला होता.

उत्पन्नासारख्या संवेदनशील विषयांवर केलेल्या सर्वेक्षणांमध्ये चुकीचे घटक निवडण्यात (नॉन-सॅम्पलिंग) चुका झाल्यास एक मोठे आव्हान निर्माण होते, असे सहभागींना संबोधित करताना,प्रमुख पाहुणे,उपमहासंचालक, एनएसओ (एचएसडी),कोलकाता अमिताव साहा, यांनी आपल्या भाषणात यांनी स्पष्ट केले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रतिसादकर्त्यांना गोपनीयतेची खात्री देणे, योग्य मार्गदर्शन प्रदान करणे आणि विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे,असे या संदर्भात, सांगितले. सर्वेक्षणपूर्व प्रशिक्षण हे या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
दिल्ली येथील एफओडी (मुख्यालय) येथील एनएसओच्या अतिरिक्त महासंचालक सुनीता भास्कर यांनी या कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षणाच्या निकालांची सरकार आणि धोरणकर्ते आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे बनले आहे,असे त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.व्यावहारिक आयाम आणि गटचर्चा या उपक्रमांचा समावेश असलेल्या,या प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा, क्षेत्रीय कामकाजादरम्यान प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन त्यांनी सहभागींना केले. त्यांनी जनजागृती, प्रसिद्धी आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वयाचे असलेले महत्त्व देखील अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (CQCD), पश्चिम विभाग, नागपूर येथील उपमहासंचालक श्रीनिवास उप्पाला यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात सर्व मान्यवरांचे, वक्त्यांचे आणि सहभागींचे हार्दिक स्वागत केले आणि प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. देशाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील सर्वेक्षण आहे आणि त्याचे यश क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या समजुती, कार्यक्षमता आणि वचनबद्धतेवर अवलंबून आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्रशिक्षण कार्यक्रमात परस्परसंवादी सत्रे, व्यावहारिक उदाहरणे आणि गट उपक्रमांचा समावेश होता, ज्यामुळे सहभागींना सर्वेक्षण संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
पश्चिम विभाग, नागपूरचे संचालक,एल. एम. जडेजा,एनएसओ (सीक्यूसीडी),यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाशी संबंधित सर्व वक्ते, सहभागी आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यात हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाचे संचालक रंगा श्रीनिवासुलु यांचीही उपस्थिती लाभली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी प्रियांक गौड यांनी केले. यावेळी पश्चिम विभागातील विभागीय कार्यालय तसेच प्रादेशिक कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
***
शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224744)
अभ्यागत कक्ष : 75