शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा 6 फेब्रुवारी 26 रोजी 11 वा दीक्षांत समारंभ

Posted On: 05 FEB 2026 4:54PM by PIB Mumbai

पणजी, 5 फेब्रुवारी 2026

गोवा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा 11 वा दीक्षांत समारंभ 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता कुंकळ्ळी इथल्या संस्था  संकुलात आयोजित करण्यात आला आहे. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘ग्रोथ ग्रेव्ही’चे संस्थापक आणि याच संस्थेचे माजी विद्यार्थी वीरेश वझिराणी हे या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

या दीक्षांत समारंभात एकूण 216 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली  जाईल.  यामध्‍ये   162 बी.टेक, 30 एम.टेक आणि 24 पीएच.डी संशोधकांचा समावेश आहे. संस्थेने रोजगाराच्या बाबतीत लक्षणीय यश मिळवले असून, एकूण 108 कंपन्यांनी संकुलातील भरती प्रक्रियेत सहभाग घेतला.  विद्यार्थ्यांना  पदवीपूर्व मिळालेले सर्वोच्च वार्षिक वेतन पॅकेज 21.6 लाख रुपये इतके आहे,  तर सरासरी वेतन पॅकेज 8.10 लाख रुपये इतके आहे. नियुक्त्या देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भारत पेट्रोलियम, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॉन यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह इंटेल, डेल आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे.

गोवा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने संशोधन आणि नवोन्मेषाच्या बाबतीतही मोठी प्रगती केली आहे. संस्थेने आतापर्यंत साधारण 41 कोटी रुपये मूल्याचे 56 प्रकल्प मिळवले असून 22 संशोधनांचे बौध्दिक स्वामित्व  प्राप्त केले आहेत. तसेच, मुंबई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने अनुसंधान राष्‍ट्रीय संशोधन प्रतिष्‍ठान संयुक्त  कार्यक्रमांतर्गत 6.33 कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्पही संस्थेला मिळाला आहे.

2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुसरून, संस्थेने आंतरशाखीय शिक्षण, कौशल्य विकास, भारतीय ज्ञान प्रणाली आणि उद्योग केंद्रित शिक्षणावर भर असलेला सुधारित अभ्यासक्रम लागू केला आहे. संस्थेने प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत 13 सामंजस्य करार करून शैक्षणिक सहकार्याही अधिक मजबूत केले आहे.


सुवर्णा बेडेकर /तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2223866) अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein: English