अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांबाबत दिशाभूल करणारी वृत्ते खोडून काढण्यासाठी स्थापन समितीची दुसरी बैठक केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न


प्रक्रिया-युक्त अन्नपदार्थांबाबत चुकीची माहिती खोडून काढण्याचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे आवाहन

Posted On: 02 FEB 2026 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2026

 

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांबाबत दिशाभूल करणारी माहिती खोडून काढण्यासाठी स्थापन समितीची दुसरी बैठक केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात पार पडली. या बैठकीला समिती सदस्य, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी अन्न सुरक्षा, पोषण, अन्नपदार्थांची नासाडी कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अन्न प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले आणि प्रक्रियायुक्त  अन्नपदार्थांबाबत पसरलेली मिथके आणि चुकीच्या माहिती विज्ञान-आधारित संप्रेषण, पारदर्शकता आणि जबाबदार सहभागाद्वारे सक्रियपणे खोडून काढली  पाहिजे यावर भर दिला. लोकांचा संतुलित दृष्टिकोन तयार करण्यासाठी आणि अन्न प्रक्रियेची अचूक आणि विश्वासार्ह माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इतर जनसंपर्क माध्यमांबरोबरच हितधारकांच्या सामूहिक जबाबदारीचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

   

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सचिव अविनाश जोशी यांनी मागील बैठकीनंतर केलेल्या उपाययोजनांची थोडक्यात माहिती दिली, ज्यामध्ये हितधारकांशी सल्लामसलत, तज्ञांचा आढावा आणि मंजुरी दिलेल्या एफएक्यू अर्थात  वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा देशव्यापी प्रसार यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी लोकांमधील माहितीपूर्ण संवाद मजबूत करण्यासाठी हितधारकांच्या समन्वित  प्रयत्नांची गरज असल्याचा पुनरुच्चार केला.

या बैठकीला अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे विशेष सचिव, सहसचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था यासारख्या प्रमुख नियामक आणि तांत्रिक संस्थांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत पुन्हानी हे देखील उपस्थित होते.  FICCI, CII, ASSOCHAM, AIFPA, AFSTI आणि FSNM यासारख्या आघाडीच्या उद्योग संघटना तसेच प्रमुख अन्न प्रक्रिया कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सहभागाने चर्चा अधिक समृद्ध झाली. यातून प्रक्रियायुक्त अन्नापदार्थांबाबत  दिशाभूल करणारी प्रसिद्धी रोखण्यासाठी संपूर्ण सरकार आणि संपूर्ण उद्योग दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2222375) अभ्यागत कक्ष : 4