गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे केले अभिनंदन
Posted On:
26 JAN 2026 10:38PM by PIB Mumbai
मुंबई, 26 जानेवारी 2026
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे देशाप्रती त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल अभिनंदन केले आहे.
कला, साहित्य, संगीत, क्रीडा आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांमधील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाची नोंद घेत, केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, हे राज्य दीर्घकाळापासून अनेक सुप्रसिध्द व्यक्तीमत्वांच्या कार्याची आणि सफल कामगिरीची भूमी आहे.
एक्स मंचावर पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा करणाऱ्या संदेशाला प्रतिसाद देत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले:
महाराष्ट्र ही कला, साहित्य, संगीत, क्रीडा आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुप्रसिध्द असलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांची कर्मभूमी आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांची पद्म विभूषण पुरस्कारासाठी; अलका याग्निक, पीयूष पांडे, उदय कोटक यांची पद्म भूषण पुरस्कारासाठी; रोहित शर्मा, सतीश शाह, आर.माधवन, अर्मिडा फर्नांडीस, अशोक खाडे,जनार्दन बापूराव बोथे, जुजर वासी, रघुवीर तुकाराम खेडकर, भिकल्या लाडक्या धिंडा, सत्यनारायण नुवाल आणि श्रीरंग देवबा लाड यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2218940)
अभ्यागत कक्ष : 84