अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाबार्ड गोवाद्वारे राज्य ऋण चर्चासत्र 2025-26 चे आयोजन, स्टेट फोकस पेपर 2026-27 चे केले अनावरण

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 8:11PM by PIB Mumbai

गोवा, 22 जानेवारी 2026

 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या  (नाबार्ड) गोवा प्रादेशिक कार्यालयाने 22 जानेवारी 2026 रोजी पणजीतील पट्टो येथे राज्य ऋण चर्चासत्र  2025-26 चे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या  कार्यक्रमाचे अध्यक्षपदही भूषवले आणि स्टेट फोकस पेपर 2026–27 चे औपचारिक अनावरण केले.

उपस्थितांना संबोधित करताना, मुख्यमंत्र्यांनी नाबार्डच्या प्राधान्य क्षेत्रांचा समावेश असलेल्या व्यवहार्य आणि दूरदर्शी पत आराखड्याचे कौतुक केले. त्यांनी बँकांना गोवा अमृत काल कृषी धोरण 2025 अंतर्गत उच्च-मूल्याच्या फलोत्पादन, वृक्षारोपण पुनरुज्जीवन, सेंद्रिय शेती समूह, प्रिसिजन ऍग्रीकल्चर आणि कृषी-पर्यटनाला सक्रियपणे पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

2026  हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी  वर्ष असल्याचे अधोरेखित करताना, डॉ. सावंत यांनी महिला शेतकरी, बचत गट आणि महिलांच्या नेतृत्वाखालील कृषी उद्योजकतेला केंद्रित संस्थात्मक कर्ज देण्याचे आवाहन केले, ज्यामुळे कृषी मूल्य साखळींमध्ये त्यांचे नेतृत्व सक्षम होईल.  मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि एमएसएमई विकासात एकरूपता आणि नव्याने निर्माण झालेल्या कुशावती जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज यावरही त्यांनी भर दिला.

   

स्वयंपूर्ण गोवेम आणि विकसित गोवा 2037 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत, स्टेट फोकस पेपर 2026–27  हा सर्व हितधारकांसाठी पत क्षमतेला उत्पादक मालमत्ता, शाश्वत उपजीविका आणि लवचिक ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक सामायिक मार्गदर्शक आराखडा  म्हणून काम करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी, निवडक सहकारी संस्थांच्या यशोगाथा दर्शवणारी  "सहकार से समृद्धी - गोव्याच्या सहकारी संस्थांच्या प्रेरणादायी कथा" नावाची पुस्तिका आणि गोव्यातील नाबार्डच्या विकासात्मक उपक्रमांवर एक लघुपटदेखील प्रकाशित करण्यात आला.

या अनावरण समारंभाला गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदावेलू; गोवा सरकारचे सचिव (सहकार) शकील उल रहमान राथर; नाबार्ड गोवा प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक आणि प्रभारी अधिकारी संदीप धारकर; आरबीआयच्या उपमहाव्यवस्थापक  सँड्रा रॉड्रिग्ज आणि  एजीएम, एसबीआय आणि एसएलबीसी संयोजक कार्लोस रॉड्रिग्ज यांच्यासह बँका, सरकारी विभाग आणि विकास संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217435) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English