माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हज फिल्म बाजारचे पाठबळ लाभलेला "फिशर्स ऑफ मेन" हा चित्रपट हाँगकाँग-एशिया फिल्म फायनान्सिंग फोरम 2026 मध्ये निवडक चित्रपटांच्या यादीत समाविष्ट

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 7:02PM by PIB Mumbai

मुंबई, 22 जानेवारी 2026

 

वेव्हज फिल्म बाजारने संजू सुरेंद्रन दिग्दर्शित फिशर्स ऑफ मेन या चित्रपटाची हाँगकाँग-एशिया फिल्म फायनान्सिंग फोरम (HAF24) च्या 24 व्या आवृत्तीसाठी अधिकृत निवड झाल्याचे जाहीर केले. HAF इन-डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स (IDP) श्रेणी अंतर्गत ही निवड झाली आहे. ही निवड या चित्रपटाच्या  प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याला वेव्हज फिल्म बाजार 2024 मध्ये गती मिळाली.

वेव्हज फिल्म बाजार  2024 मध्ये सह-निर्मिती बाजारपेठेचे ठळक वैशिष्ट्य  म्हणून निवड झालेल्या, फिशर्स ऑफ मेन त्याची उत्तम कलात्मक दृष्टी आणि व्यावसायिक क्षमतेसाठी ओळखला जातो. या चित्रपटाला  5,000 अमेरिकन डॉलर्सचे रोख अनुदान मिळाले, ज्यामुळे त्याची क्षमता वृद्धिंगत झाली  आणि सुरुवातीच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण पाठबळ मिळाले. वेव्हज फिल्म बाजारने चित्रपटासाठी  लाँचपॅड म्हणून काम केले, ज्याने भारतीय कथाकथनाला जागतिक चित्रपट बाजारपेठांशी जोडण्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक प्रोत्साहन दिले.

हा चित्रपट आता विस्तारित हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (HKIFF) इंडस्ट्री प्रोजेक्ट मार्केट 2026 मध्ये भारतीय चित्रपटांच्या  उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करेल.  हाँगकाँग कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे 17 ते 19 मार्च 2026 दरम्यान याचे आयोजन केले जाईल.  30 व्या हाँगकाँग फिल्ममार्टच्या बरोबरीने आयोजित, हे व्यासपीठ फिशर्स ऑफ मेनला आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठादार, विक्री एजंट आणि सह-निर्मिती भागीदारांशी संवाद साधण्यास सक्षम बनवेल.

HAF24 मध्ये "फिशर्स ऑफ मेन" ची निवड माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्हज फिल्म बाजार सारख्या देशांतर्गत व्यासपीठांद्वारे चित्रपट निर्मितीतील प्रतिभेला प्रोत्साहन आणि अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने वाटचाल सुलभ करण्याप्रति वचनबद्धता अधोरेखित करते. हे यश जागतिक चित्रपट बाजारपेठेत भारताची वाढती उपस्थिती आणि उच्च-क्षमतेच्या प्रकल्पांना पाठिंबा देण्यात संरचित उद्योग उपक्रमांचा  प्रभाव प्रतिबिंबित करते.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217387) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English