पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
जागतिक ऊर्जा परिवर्तनाची रूपरेखा आखण्यासाठी धोरणात्मक परिषदेचे आयोजन : भारत ऊर्जा सप्ताह 2026
Posted On:
15 JAN 2026 6:37PM by PIB Mumbai
अहमदाबाद, 15 जानेवारी 2026
भारत ऊर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू) 2026, ही वर्षातील पहिली प्रमुख जागतिक ऊर्जा परिषद असून 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान गोव्यात तिच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे.
आपल्या पहिल्या तीन अत्यंत यशस्वी आवृत्त्यांनी निर्माण केलेल्या मजबूत गती आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या आधारावर ही परिषद आयोजित केली जाणार आहे.
आयईडब्ल्यू 2026 च्या आयोजनाच्या केंद्रस्थानी धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधीच्या संकल्पना आहे. यानुसार अतिशय दक्षतापूर्वक निश्चित केलेल्या धोरणात्मक संकल्पना मांडण्यात येणार आहेत. या संकल्पना एकत्रितपणे जागतिक ऊर्जा परिसंस्थेला आकार देणाऱ्या जटिल आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक व्यापक चौकट प्रदान करतात.
या परिषदेमध्ये 'एनर्जी डिजिटल फ्रंटियर्स' या संकल्पनेचाही धांडोळा घेण्यात येणार आहे. यानुसार ऊर्जा प्रणाली आणि डिजिटल नवोपक्रमाचा संगम कशा प्रकारे कामकाजाला नव्याने आकार देवू शकेल, पुरवठा-मागणी यामध्ये उत्तम व्यवस्थापन निर्माण करणे, तसेच नवीकरणीय ऊर्जा आणि पर्यायी इंधनांच्या एकात्मतेला गती देणे, यावर प्रकाश टाकला जाणार आहे.
'एनर्जी इनोव्हेशन' ही संकल्पना नवोन्मेषाचा एक केंद्रीय स्तंभ म्हणून कायम आहे. यामुळे नव्या पिढीतील अत्याधुनिक स्वच्छ तंत्रज्ञानाचा विकास आणि उपयोजन तसेच डिजिटल कार्यक्षमतेतील प्रगतीचा शोध घेण्यात येईल. 2026साठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेली 'एनर्जी इन्व्हेस्टमेंट' अर्थात उूर्जा गुंतवणूक ही संकल्पना ऊर्जा संक्रमणासाठी जागतिक भांडवल उभारणे, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि हवामान तंत्रज्ञान गुंतवणुकीतील तफावत भरून काढणे यावर लक्ष केंद्रित करते.
या संकल्पनांचे अर्थपूर्ण संवादात रूपांतर करण्यासाठी, धोरणात्मक परिषद काळजीपूर्वक तयार केलेल्या विविध सहभाग स्वरूपात आयोजित केली जाईल.
मंत्रिस्तरावरील सत्रांमध्ये ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ धोरणकर्ते जागतिक ऊर्जा बाजारपेठा, ऊर्जा सुरक्षा, निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट आणि विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील.
'लीडरशिप स्पॉटलाइट’ सत्रामध्ये भारताच्या ऊर्जा नेतृत्वाच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केले जाईल, त्यामध्ये पायाभूत सुविधा विकास, हवामान तंत्रज्ञान परिसंस्था आणि बाजार-स्तरीय संधींवर प्रकाश टाकला जाईल.
'ऊर्जा संवाद ' या सत्रात जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ नेते आणि अनुभवी सूत्रसंचालक यांना केंद्रित, समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यातून धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि निर्णय प्रक्रियेबद्दल सखोल माहिती मिळेल.
आयईडब्ल्यू 2026: जागतिक ऊर्जा नेतृत्वासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2215024)
अभ्यागत कक्ष : 87