Posted On:
12 JAN 2026 9:24PM by PIB Mumbai
पुणे, 12 जानेवारी 2026
पुणे येथील हवाई दल तळावर 14 जानेवारी 26 रोजी संरक्षण दलाचा 10 वा माजी सैनिक दिन साजरा केला जाणार आहे. 1953 मध्ये या दिवशी निवृत्त झालेले दिवंगत फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या लष्करी इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ (सी-इन-सी) फील्ड मार्शल करिअप्पा यांनी 1947 च्या युद्धात विजय मिळवून दिला आणि सेवा, शिस्त आणि देशभक्तीच्या चिरंतन वारशाचा पाया रचला.

हा दिवस भारतीय सशस्त्र दलात सेवा बजावलेल्या शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. पुणे येथील हवाई दल तळावरील कार्यक्रमापूर्वी स्टेशन वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून शूर सैनिकांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी आणि राष्ट्राप्रति समर्पित सेवेसाठी आदरांजली वाहण्यात येईल.

माजी सैनिक दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट केवळ सेवारत कर्मचारी आणि माजी सैनिकांमधील बंध मजबूत करणे हे नसून पेन्शन, तक्रारी, आर्थिक सहाय्य , ईसीएचएस योजना आणि माजी सैनिकांच्या फायद्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे असेल. या दिवशी, एअर व्हेटरन्स डायरेक्टरेट (डीएव्ही),प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स (पीसीडीए) आणि जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यासह विविध सरकारी संस्था विविध बाबींवर माजी सैनिकांना मदत करण्यासाठी संवाद मंच स्थापन करतील.
1I2D.jpeg)
व्यापक सहभाग सुलभ करण्यासाठी, हवाई दल तळाने सर्व माजी सैनिक संघटनांना कार्यक्रमाच्या तपशीलांसह ऑनलाइन नोंदणी लिंक्स उपलब्ध केल्या आहेत. पुण्यातील विविध ठिकाणांहून पिकअप आणि ड्रॉप-ऑफ सेवा देखील उपलब्ध केल्या आहेत. माजी सैनिकांना कार्यक्रमासाठी पूर्व-नोंदणी करण्यास आणि त्या दिवशी वैध ओळखपत्रे घेऊन येण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. या माजी सैनिक दिनाला तिन्ही सेवांमधील अंदाजे 4,000–5,000 माजी सैनिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai