संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय वायू दलाच्या कार्यपद्धतीची समज वाढवण्यासाठी थिंक टँक्समधील अभ्यासकांनी वायू दलाच्या तळाला दिली भेट

प्रविष्टि तिथि: 10 JAN 2026 8:14PM by PIB Mumbai

 

प्रमुख थिंक टँक्समधील 57 संशोधन अभ्यासकांच्या एका शिष्टमंडळाने, संपर्क कार्यक्रमाचा भाग म्हणून, 10 जानेवारी 2026 रोजी भारतीय वायू दलाच्या हिंडन येथील प्रमुख तळाला भेट दिली. या शिष्टमंडळात मनोहर पर्रिकर - संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (एमपी-आयडीएसए), ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ), विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान (व्हीआरएस), सेंटर फॉर एरोस्पेस पॉवर अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (सीएपीएसएस), भू-युद्ध अभ्यास केंद्र (सीएलएडब्ल्यूएस), राष्ट्रीय सागरी प्रतिष्ठान (एनएफएम), भारत प्रतिष्ठान, समकालीन चीन अभ्यास केंद्र (सीसीसीएस), युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (यूएसआय) आणि संयुक्त युद्ध अभ्यास केंद्र (सीईएनजीओडब्ल्यूएस) या संस्थेतील अभ्यासकांचा समावेश होता.

अभ्यासकांना वायू दलाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून वायू दलाची कार्यात्मक पद्धती समजून घेण्याची संधी देणे तसेच सहयोगी संशोधनासाठी मार्ग शोधणे हा या भेटीचा उद्देश होता. हिंडन येथील वायू दल तळाच्या एअर ऑफिसर कमांडिंग अधिकाऱ्यांनी अभ्यासकांचे स्वागत केले तसेच भारतीय वायू दल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये भागीदारी वाढवण्याबाबत उत्साह व्यक्त केला.

अभ्यासकांना भारतीय वायू दलाचा इतिहास, क्षमता आणि कामगिरीबाबत सर्वसमावेशक माहिती देण्यात आली. या शिष्टमंडळाला वायू दलाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही देण्यात आली. तर शिष्टमंडळ सदस्यांनी वायू दलाच्या कार्यपद्धतीच्या विविध पैलूंवर आपल्या अनुभवांची आणि विचारांची देवाणघेवाण केली.

ही भेट भारतीय वायू दल आणि थिंक टँक्स यांच्यात परस्पर सामंजस्य आणि सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. यामुळे संशोधन प्रकल्प आणि शैक्षणिक देवाणघेवाणीद्वारे पुढील सहकार्यासाठीचा मार्गही मोकळा झाला आहे.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2213346) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी