वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रमेश कुमार जुनेजा यांनी चर्म निर्यात परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

Posted On: 07 JAN 2026 8:43PM by PIB Mumbai

मुंबई, 7 जानेवारी 2026


चर्म निर्यात परिषदेचे उपाध्यक्ष रमेश कुमार जुनेजा यांनी परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. चेन्नई इथे 06 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थिती अशा मिश्र  स्वरुपात परिषदेच्या प्रशासकीय समितीची 184 वी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. चर्म निर्यात परिषद ही केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयद्वारे पुरस्कृत असलेली एक निर्यात प्रोत्साहन परिषद आहे.

रमेश जुनेजा हे एक द्रष्टे उद्योजक आणि व्यावसायिक रणनीतीकार आहेत. त्यांनी आपल्या कौशल्य आणि क्षमतेच्या बळावर विविध क्षेत्रांतील यशस्वी कंपन्यांची स्थापना केली आहे. त्यांनी चर्मोत्पादन (जे.सी. समुह), चामड्याच्या वस्तू, रसायने (इंडोटन केमिकल्स) आणि बांधकाम व्यवसाय (जुनेजा इन्फ्रास्ट्रक्चर) अशा विविध उद्योगांमध्ये मोलाचे योगदान दिले असून, कायम नवोन्मेषाला चालना दिली आहे.

गेल्या चार दशकांपासून ते चर्मोद्योग क्षेत्रातही कार्यरत आहेत. जेसी समुहाचे संस्थापक म्हणून त्यांनी 1980 च्या दशकात आंतरराष्ट्रीय किरकोळ विक्रेत्यांशी भागिदारी करत तयार चामड्याचे नामांकित टॅनर म्हणून या उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली होती.

जुनेजा हे गेल्या 15 वर्षांपासून चर्म निर्यात परिषद मंडळाचे सदस्य आहेत.  2014 पासून ते पूर्व विभागाचे प्रादेशिक अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. एप्रिल 2024 मध्ये त्यांनी परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर चर्म वस्तू  आणि सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या पोशाखांच्या निर्यातीत विक्रमी वाढ साध्य करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शनपर योगदान दिले आहे.

याव्यतिरिक्त, जुनेजा हे इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. रेल्वे, पायाभूत सुविधा, अन्न आणि चामडे यांसारख्या क्षेत्रांत इटली आणि भारत यांच्यात मोठी गुंतवणूक आणि सहकार्यपूर्ण  भागिदारी स्थापित करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी  बजावली आहे. यासोबतच ते कलकत्ता लेदर कॉम्प्लेक्स टॅनर्स असोसिएशनचे संस्थापक समिती सदस्य असून, त्यांनी सुमारे दशकभर या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही सेवा दिली आहे.


‍निलीमा चितळे/तुषार पवार/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2212229) अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein: English