ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसीने ओलांडला 85.5 गिगावॅट व्यावसायिक क्षमतेचा मैलाचा टप्पा

Posted On: 18 DEC 2025 6:10PM by PIB Mumbai

मुंबई, 18 डिसेंबर 2025

एनटीपीसीने आज गुजरात आणि राजस्थान राज्यांमधील आपल्या  संलग्न कंपन्यांच्या विविध सौर प्रकल्पांद्वारे 359.58 मेगावॅट व्यावसायिक क्षमतेची वाढ जाहीर केली. यामुळे समूहाची व्यावसायिक क्षमता 85.5 गिगावॅटपेक्षा अधिक झाली आहे.

एनटीपीसीने आपली संलग्न कंपनी एनजीईएलच्या माध्यमातून, एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या गुजरात येथील 1255 मेगावॅटच्या खावडा-1 सौर पीव्ही प्रकल्पाच्या 243.66 मेगावॅट क्षमतेच्या भागाची व्यावसायिक संचालन सुरुवात  घोषित केली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने राजस्थानमधील एनटीपीसीच्या नोख सोकर पीव्ही प्रकल्पाच्या (3x 245 मेगावॅट) 245 मेगावॅट क्षमतेपैकी 78 मेगावॅट क्षमतेची व्यावसायिक संचालन सुरुवातदेखील घोषित केली आहे.

कंपनीने एनटीपीसी आरईएलच्या गुजरात येथील  450 मेगावॅट हायब्रीड ट्रेंच V प्रकल्पांतर्गत खावडा सौर ऊर्जा प्रकल्पातील 300 मेगावॅट क्षमतेपैकी 37.925 मेगावॅट  क्षमतेच्या व्यावसायिक संचालन  दिनांकाची घोषणादेखील केली आहे. यामुळे एनटीपीसी समूहाची एकूण स्थापित आणि व्यावसायिक क्षमता 85541 मेगावॅटवर पोहोचली आहे.

एनटीपीसी लिमिटेड भारताच्या एकूण विजेच्या गरजेपैकी जवळपास एक चतुर्थांश योगदान देते  आणि तिची स्थापित क्षमता 85 गिगावॉटपेक्षा जास्त आहे.  तसेच 30.90 गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प निर्माणाधीन असून यात  13.3 गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमतेचा समावेश आहे. भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्टांच्या अनुषंगाने, ही कंपनी 2032 पर्यंत  60 गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता प्राप्त करण्यास कटिबद्ध आहे.

औष्णिक, जलविद्युत, सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांचा समावेश असलेल्या विविधतेसह  एनटीपीसी देशासाठी विश्वसनीय, किफायशीर आणि शाश्वत वीज पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने  हरित भविष्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे, नवोन्मेषाला  चालना देणे आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे सुरू ठेवले आहे.

एनटीपीसीने वीज निर्मितीपलीकडे, एनटीपीसीने ई-मोबिलिटी , बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली, पंप्ड हायड्रो स्टोरेज, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, अणुऊर्जा आणि हरित हायड्रोजन उपाय यांसारख्या नवीन व्यावसायिक क्षेत्रांमध्येही  विस्तार केला आहे.

निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2206128) अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein: English