वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत एकूण निर्यात (व्यापारी माल आणि सेवा), 562.13 अब्ज डॉलर्स झाल्याचा अंदाज, एप्रिल ते नोव्हेंबर 2024 मधील 533.16 अब्ज डॉलरच्या तुलनेत अंदाजे 5.43% वाढ

Posted On: 15 DEC 2025 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025

नोव्हेंबर 2025* साठी भारताची एकूण निर्यात (व्यापारी माल आणि सेवा एकत्रित) 73.99 अब्ज डॉलर्स झाली  असा अंदाज आहे, ज्यात गेल्या वर्षीच्या म्हणजे 2024 च्या नोव्हेंबर महिन्यातील निर्यातीच्या तुलनेत 15.52 टक्के सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे. नोव्हेंबर 2025* मधील एकूण आयात (व्यापारी माल आणि सेवा एकत्रित) 80.63 अब्ज डॉलर्स झाल्याचा अंदाज आहे, आणि त्यात नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत (-) 0.60 टक्के नकारात्मक वाढ नोंदली गेली आहे.

Table 1: Trade during November 2025*

 

 

November 2025

(US$ Billion)

November 2024

(US$ Billion)

Merchandise

Exports

38.13

31.94

Imports

62.66

63.87

Services*

Exports

35.86

32.11

Imports

17.96

17.25

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

73.99

64.05

Imports

80.63

81.11

Trade Balance

-6.64

-17.06

एप्रिल-नोव्हेंबर 2025* या कालावधीत 5.43 टक्क्याची सकारात्मक वाढ नोंदवत भारताची एकूण निर्यात 562.13 अब्ज डॉलर झाली असा अंदाज आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2025* या कालावधीत 5 टक्क्यांची वाढ नोंदवत एकूण आयात 651.13 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत व्यापारी वस्तूंची निर्यात 292.07 अब्ज डॉलर्स होती, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत ती 284.60 अब्ज डॉलर्स होती.

Table 2: Trade during April-November 2025*

 

 

April-November 2025

(US$ Billion)

April-November 2024

(US$ Billion)

Merchandise

Exports

292.07

284.60

Imports

515.21

487.93

Services*

Exports

270.06

248.56

Imports

135.93

132.21

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

562.13

533.16

Imports

651.13

620.14

Trade Balance

-89.00

-86.98

एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील 487.93 अब्ज डॉलर्स मूल्याच्या आयातीच्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत वस्तूंची आयात 515.21 अब्ज डॉलर इतकी होती.

एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत वस्तूंच्या व्यापारातील तूट 223.13 अब्ज डॉलर्स होती, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 मध्ये ती 203.33 अब्ज डॉलर्स इतकी होती.
 

सेवा व्यापार

नोव्हेंबर 2025* मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 35.86 अब्ज डॉलर्स आहे, तर नोव्हेंबर 2024 मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 32.11 अब्ज डॉलर्स होते.

नोव्हेंबर 2025* मध्ये सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 17.96 अब्ज डॉलर्स आहे, तर नोव्हेंबर 2024 मध्ये हेच मूल्य 17.25 अब्ज डॉलर्स होते.

एप्रिल ते नोव्हेंबर 2025* या कालावधीतील सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 270.06 अब्ज डॉलर्स आहे, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 मध्ये हेच मूल्य 248.56 अब्ज डॉलर होते.

एप्रिल ते नोव्हेंबर 2025* या कालावधीतील सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 135.93 अब्ज डॉलर्स आहे, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 मध्ये ते 132.21 अब्ज डॉलर्स होते.

एप्रिल ते नोव्हेंबर 2025* साठी सेवा व्यापारातील अधिशेष 134.13 अब्ज डॉलर्स आहे, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 मध्ये तो 116.35 अब्ज डॉलर होता.


सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 


(Release ID: 2204279) अभ्यागत कक्ष : 70