युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“विकसित भारत - 2047” साठी प्रमुख घटक म्हणून तरुणांना सक्षम करण्यासाठी सरकार वचनबद्ध”

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2025 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय विकासाचे उत्प्रेरक आणि राष्ट्र उभारणीत भागीदार म्हणून काम करण्यासाठी तरुणांना सक्षम करण्यासाठी तसेच 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रगतीचे राजदूत म्हणून योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याबाबत सरकारच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

तरुणांच्या परिवर्तनकारी भूमिकेचा वेध घेऊन युवा व्यवहार विभागाने नेतृत्व, सामुदायिक सहभाग आणि सकारात्मक युवा विकासाला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. 

विभागाने आपल्या प्रमुख युवा संघटना - माय भारत (मेरा युवा भारत), राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था (आरजीएनआयवायडी) आणि विविध योजनांमार्फत तरुणांमध्ये क्षमता निर्माण, नेतृत्व विकास आणि राष्ट्र उभारणी या गुणांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये युवा नेतृत्व कार्यक्रम, उद्योजकता आणि नवोन्मेष, क्षमता बांधणी, अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम, स्वयंसेवी कार्यक्रम, सामाजिक विकास मोहिमा आणि सामुदायिक सेवा यांचा समावेश आहे. विकसित भारत-2047 च्या राष्ट्रीय दृष्टिकोनात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आवश्यक कौशल्ये, मूल्ये आणि संधींनी तरुणांना सुसज्ज करणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

याव्यतिरिक्त, एनएसएस एका संरचित स्वयंसेवक-आधारित योजनेद्वारे तरुणांना सहभागी करून घेते. एनएसएस दरवर्षी देशभरात 15 राष्ट्रीय एकात्मता शिबिरांचे (एनआयसी) आयोजन करते ज्यामध्ये एकता, सांस्कृतिक विविधता, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक शिबिरात 200 निवडक स्वयंसेवकांचा सहभाग असतो.

सरकारने आपल्या विविध योजना आणि राष्ट्रीय युवा धोरणाद्वारे तरुणांना परिश्रमपूर्वक काम करण्यास, नवोपक्रम स्वीकारण्यास तसेच राष्ट्र उभारणीत सहभागी होण्यास सातत्याने प्रोत्साहन दिले आहे जेणेकरून त्यांची क्षमता जागतिक स्तरावर ओळखली जाईल. विविध व्यासपीठ आणि कार्यक्रम तरुणांना कठोर परिश्रम, नवोन्मेष आणि आर्थिक व सामाजिक विकास प्रक्रियांमधील सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून देतात. विभाग या उद्दिष्टांना कार्यक्रमांद्वारे याप्रमाणे प्रोत्साहन देतो:

• माय भारत, एनएसएस आणि आरजीएनआयवायडी द्वारे आयोजित युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम;

• माय भारत अंतर्गत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता प्रदर्शन कार्यक्रम;

• राष्ट्रीय युवा महोत्सव, जिल्हा युवा अधिवेशने आणि राष्ट्र उभारणी, सामाजिक जबाबदारी आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या मोहिमा;

• युवकांना पुढाकार घेण्यास, स्थानिक समस्या सोडवण्यासाठी योगदान देण्यास तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मान्यता मिळविण्यास प्रेरित करणारे उपक्रम.

• आंतरराष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रम (आयवाय ईपी), इतर बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय बैठका / शिखर परिषदा / परिषदा इ.

लोकसभेत नीरज मौर्य यांनी विचारलेल्या बिगरतारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2200590) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Urdu , Gujarati