सहकार मंत्रालय
देशभरातल्या किनारी राज्यांसाठी मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे व्हॅम्निकॉमकडून आयोजन
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2025 1:36PM by PIB Mumbai
वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (व्हॅमनिकॉम), नव्या नोंदणीकृत मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी सहकारी संस्थांचे प्रशासन आणि व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. पुण्यात, 3 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल या किनारी राज्यांमधील 10 मत्स्यपालन सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 36 अधिकारी आणि मत्स्यपालन संस्थातील मच्छिमार यात सहभागी झाले होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व, राष्ट्रीय शाश्वत मत्स्यपालन केंद्र(NaCSA) , जल उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA),वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दैहुन खोंगलम यांनी केले होते.
या कार्यक्रमात मत्स्यपालन सहकारी संस्थांमधील प्रशासन आणि व्यवस्थापन पद्धती भक्कम करण्यासाठी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन सत्र, परस्परसंवादी चर्चा आणि विशेष क्षेत्र भेटींचा समावेश होता.
4 डिसेंबर 2025 रोजी सहभागींनी, मुंबईच्या आयसीएआर- केंद्रीय मच्छिमारी शिक्षण संस्था (CIFE) येथे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अंकुश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली.

अनुभव भेटीचे प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणेः
- वर्सोवा आणि वर्सोवा मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या प्रमुखांशी संवाद
- सहकारी संस्थांचे कामकाज , बाजारपेठ संबंध आणि मत्स्यपालन मूल्य साखळीविषयी अंतर्दृष्टी प्रदान करणे.
- मत्स्य संग्रहालय, मत्स्यपालन संकुल आणि केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्थेतील कृषी व्यवसाय इनक्युबेशन केंद्राला (ABI)भेट
- 'मत्स्यपालनातील सहकारी संस्थाः संधी, आव्हाने आणि प्रशासकीय यंत्रणा' या विषयावरील तांत्रिक सत्र
पुढील तीन स्तंभांवर प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला.
- सहकारी प्रशासन आणि शाश्वत जलशेती पाया,
- आर्थिक साक्षरता, उद्योग व्यवस्थापन आणि डिजीटल सक्षमीकरण
- बाजारपेठ जोडणी, हवामान लवचिकता आणि नेतृत्व विकास
सहभागींना सहकारी संस्था उपनियम आणि देशभरात सहकारी संस्थांचा प्रभाव वृद्धिंगत करण्यासाठी सहकार मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या सद्यस्थितीतील चालू उपक्रमांची माहितीही मिळाली.
व्हॅमनिकॉमच्या संचालक डॉ. सुवा कांता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम राबवण्यात निबंधक डी. एस. धर्मराज यांनी धोरणात्मक पाठिंबा देत महत्त्वाची भूमिका बजावली.
सहाय्यक प्राध्यापक आणि कार्यक्रम संचालक डॉ. अमित बोरकर, यांनी कार्यक्रमाची शैक्षणिक रचना आणि संचलनाची धुरा सांभाळली आणि व्हॅमनिकॉमच्या सर्व प्राध्यापकांचे त्यांच्या सक्रिय सहभाग आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले.
व्हॅमनिकॉमच्या प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाने, भारताच्या उदयोन्मुख मत्स्यपालन सहकारी संस्थांमध्ये प्रशासन मानके, व्यवसाय क्षमता आणि शाश्वत पद्धती अंगिकारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल अधोरेखित केले आहे. सहकारी नेतृत्वाला आधुनिक साधने, सर्वोत्तम पद्धती आणि तांत्रिक कौशल्याने सुसज्ज करून हा उपक्रम भारत सरकारच्या किनारी समुदायालांना बळकटी देणे आणि देशातील मत्स्यपालनाच्या नील अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्याच्या मोहिमेत व्यापक योगदान देत आहे.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2200034)
आगंतुक पटल : 24