पर्यटन मंत्रालय
महाराष्ट्रातील पर्यटन विषयक पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय सहाय्य केले बळकट - स्वदेश दर्शन, एसडी2.0, सीबीडीडी, प्रशाद, एसीएटीआयडी आणि एसएएससीआय अंतर्गत अनेक प्रकल्पांना मंजुरी
Posted On:
04 DEC 2025 7:26PM by PIB Mumbai
2022 ते 2024 दरम्यान महाराष्ट्रात पर्यटकांच्या भेटींमध्ये सातत्याने वाढ दिसून आली. 2022 मध्ये राज्याला 11,12,97,624 देशांतर्गत पर्यटकांनी तर 15,11,623 परदेशी पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली. 2023 मध्ये ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली, देशांतर्गत भेटी 16,13,59,527 आणि परदेशी भेटी 33,87,739 झाल्या. 2024 मध्येही हाच कल कायम राहिला, जेव्हा महाराष्ट्रात अंदाजे 18,93,71,541 देशांतर्गत पर्यटक भेटी आणि 37,05,170 परदेशी पर्यटक भेटी झाल्या, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात मोठी वाढ दिसून आली.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याला विविध केंद्रीय क्षेत्रातील योजनांअंतर्गत आर्थिक मदत दिली आहे - स्वदेश दर्शन( एसडी) आणि स्वदेश दर्शन एसडी (2.0) , आव्हान आधारित गंतव्यस्थान विकास (सीबीडीडी), तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम (प्रशाद), पर्यटन पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्रीय संस्थांना सहाय्य (एसीएटीआयडी) आणि भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (एसएएससीआय) - जेणेकरून ते पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच शाश्वत, समुदाय-केंद्रित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या प्रयत्नांना पूरक ठरेल.
महाराष्ट्रात मंजूर/समर्थित प्रकल्प (योजनेनुसार तपशील):
स्वदेश दर्शन (एसडी)
- सिंधुदुर्ग कोस्टल सर्किटचा विकास - सागरेश्वर, तारकर्ली, विजयदुर्ग (समुद्रकिनारा आणि खाडी), मिठबाव (मंजूर वर्ष: 2015-16) - ₹19.06 कोटी. भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याचे वृत्त आहे.
स्वदेश दर्शन 2.0 (एसडी 2.0)
- शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क - टप्पा 3, पुणे (मंजूर वर्ष: 2023-24) — ₹76.22 कोटी.
- आव्हान आधारित गंतव्यस्थान विकास (सीबीडीडी)
- अहमदनगर किल्ल्याचा विकास (मार्च 2025 मध्ये मंजूर) — ₹25.00कोटी.
- तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम (प्रशाद)
- त्र्यंबकेश्वर, नाशिकचा विकास (मंजूर वर्ष: 2017-18) — ₹45.41 कोटी.
- भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (एसएएससीआय))
- राम-काल पथ, नाशिक (नोव्हेंबर 2024 मध्ये मंजूर) — ₹99.14 कोटी.
- माजी आयएनएस गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ आणि सबमरीन टुरिझम, सिंधुदुर्ग (मंजूर नोव्हेंबर 2024) — ₹46.91 कोटी.
- महाराष्ट्रासाठी एसएएससीआयकडून एकूण मंजूर: ₹146.05 कोटी.
पर्यटन पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्रीय संस्थांना मदत (एसीएटीआयडी/ एसीए)
- पर्यटन स्थळ म्हणून कानोजी आंग्रे दीपगृहाचा विकास (09.08.2016) — ₹15.00 कोटी.
- इंदिरा डॉक, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे अपग्रेडेशन/आधुनिकीकरण (29.12.2017) — ₹12.50 कोटी.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील इंदिरा डॉक येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे अपग्रेडेशन/आधुनिकीकरण (20.12.2021) — ₹37.50 कोटी.
- नांदेड रेल्वे स्टेशन (31.03.2017) — ₹5.18 कोटी.
- औरंगाबाद रेल्वे स्टेशन (12.03.2018) — ₹5.71 कोटी.
स्वदेश दर्शन आणि प्रशाद योजनांअंतर्गत (महाराष्ट्रातील निवडक प्रकल्प सूचीबद्ध), परिशिष्टात नोंदवलेला एकूण मंजूर खर्च ₹64.53कोटी आहे (सिंधुदुर्ग कोस्टल सर्किट आणि वाकी-आदासा-धापेवाडा-परडसिंघा-तेलंखंडी-गिरड आध्यात्मिक सर्किट प्रकल्पांसह).
पर्यटन मंत्रालयाने प्रशाद किंवा स्वदेश दर्शन अंतर्गत संभाव्य वारसा आणि आध्यात्मिक पर्यटन सर्किट म्हणून कोल्हापूरची निवड केलेली नाही किंवा मंजुरी दिलेली नाही; दिलेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या केंद्रीय योजनांअंतर्गत महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव किंवा पन्हाळा किल्ल्यावरील कोणत्याही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनांकडून विकास प्रस्ताव ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रकल्पांची तपासणी केली जाते आणि अटींची पूर्तता आणि निधीची उपलब्धता यांच्या अनुषंगाने मंजुरी दिली जाते.
जबाबदार पर्यटन तत्त्वांचे एकत्रीकरण, पर्यटकांच्या सुविधा आणि अनुभवांमध्ये सुधारणा, स्थानिक सहभाग सक्षम करणे आणि संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित करणे यासारख्या शाश्वत, समुदाय-आधारित पर्यटन विकासावर आपला भर असल्याची पुष्टी मंत्रालयाने केली आहे.
पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका बिगरतारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2199119)
अभ्यागत कक्ष : 30