सांस्कृतिक मंत्रालय
महाराष्ट्रात एएसआयने हाती घेतले महत्त्वपूर्ण संवर्धन कार्य; पुण्यातील स्मारकांना सातत्यपूर्ण पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 5:19PM by PIB Mumbai
पुण्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाची तीन प्राचीन स्मारके आहेत ती म्हणजे शनिवारवाडा, आगा खान पॅलेस आणि पाताळेश्वर गुंफा मंदिर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए एस आय) विभागाद्वारे त्यांची देखभाल आणि संवर्धन केले जाते.
गेल्या तीन वर्षात या स्मारकांवर झालेला खर्च खालीलप्रमाणे आहे:
|
वर्ष
|
खर्च (रक्कम लाख रुपयांत)
|
|
2022-23
|
159.87
|
|
2023-24
|
139.27
|
|
2024-25
|
89.01
|
महाराष्ट्रात एएसआयची तीन मंडळ कार्यालये आहेत, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ आणि नागपूर मंडळ.
2024-25 मध्ये औरंगाबाद मंडळाला 5.20 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता, त्यापैकी 5.16 कोटी रुपये वापरण्यात आले. मुंबई मंडळाने 12.58 कोटी रुपयांच्या मंजूर निधीपैकी 12.56 कोटी रुपये निधी वापरला, तर नागपूर मंडळाने 2024-25 मध्ये 6.80 कोटी रुपयांचा मंजूर झालेला निधी वापरला.
महाराष्ट्रासह देशभरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत 3,685 केंद्रीय संरक्षित स्मारके/स्थळे आहेत. राष्ट्रीय संवर्धन धोरणानुसार स्मारके/स्थळांच्या गरजेनुसार आणि संसाधनांच्या उपलब्धतेनुसार या स्मारके/स्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार, जतन आणि देखभाल केली जाते.
वारसा संवर्धन प्रकल्पांमध्ये स्थानिक शैक्षणिक संस्था आणि नागरी संस्थांना सहभागी करून घेण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. तथापि, जागतिक वारसा सप्ताह आणि जागतिक वारसा दिन तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी विभागाद्वारे आयोजित वारसा जागरूकता कार्यक्रमांमध्ये स्थानिक शाळा आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात येते.
संरक्षित स्मारके आणि स्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध कामे करणारे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, निवडक स्मारकांवर खासगी सुरक्षा कर्मचारी तसेच सीआयएसएफ तैनात केले जातात. शिवाय; एएसआय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जाते.
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199086)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English