वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना ही केवळ नियामक संघटना नसून, सुविधा पुरवण्यासाठी मदत करणारी संघटना आहे : आर. एन. मीना, मुख्य स्फोटक नियंत्रक
नागपूर इथे पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेचे (PESO) एक दिवसीय चिंतन शिबिर संपन्न ; उद्योगक्षेत्र आणि नियामकांमधील संवादातून पेट्रोलियम, वायू, हायड्रोजन आणि स्फोटक मूल्य साखळ्यांमध्ये डिझाईनच्या पातळीपासूनच सुरक्षितता या संकल्पनेला मिळाली बळकटी
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 6:30PM by PIB Mumbai
नागपूर, 1 डिसेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या (PESO) वतीने आज नागपूर इथे भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या ऊर्जा आणि संलग्न क्षेत्रांना, नेमक्या आणि व्यावहारिक सुरक्षा परिणामकारतेसोबत जोडून घेण्यासाठी एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते.

पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेचे मुख्य स्फोटक नियंत्रक (CCE) आर. एन. मीना यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटने झाले. त्यांनी या शिबीरासाठी आलेले देशभरातील प्रतिनिधी तसेच पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या शिबीराअंतर्गत दिवसभर झालेल्या विविध कार्यसत्रांमध्ये अधिकाऱ्यांनी उद्योग प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

यावेळी आर. एन. मीना यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना ही केवळ नियामक संघटना नसून, सुविधा पुरवण्यासाठी मदत करणारी संघटना असल्याचे ते म्हणाले. ही संघटना उद्योगक्षेत्राला डिझाईनच्या टप्प्यापासूनच सुरक्षितता.स्थापित करण्याबद्दल मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडते असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून ही संघटना डिजिटल परवाना प्रणाली, पूर्वअंदाजीत सेवा कालमर्यादे संबंधित पार पाडत असलेल्या जबाबदाऱ्या तसेच, संघटनेने अलीकडेच घडवून आणलेल्या सुधारणा याविषयीची माहिती त्यांनी दिली. या सुधारणांअंतर्गत अलिकडेच परवान्यांची वैधता वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रमाणित अग्नीसुरक्षीत उपकरणांसाठी एकदाच मंजुरी आणि सिलेंडरची वेळोवेळी तपासणी तसेच बारकोडिंग यांसंबंधीत सुधारणा केल्याची माहितीही त्यांनी दिली. या सुधारणांमुळे संबंधित कार्यान्वयकासाठी अनुपालन विषयक अडचणी कमी झाल्या आहेत, आणि त्याचवेळी एकूणच सुरक्षिततेची हमीही वाढली असल्याचे ते म्हणाले.
मीना यांनी हायड्रोजन आणि एलएनजी संबंधित केलेल्या तरतुदींबाबतही माहिती दिली. यासोबतच, स्फोटक वस्तूंचा माग आणि शोध घेण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या प्रणाली (System for Explosives Tracking & Tracing - SETT) मोठ्या क्षेत्रातही अवलंबता येऊ शकते, तसेच याच्या अचूकता संबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि याचा गैरवापर टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर्सच्या दिशेने केलेले संक्रमण, याबद्दलही त्यांनी सवीस्तरपणे सांगितले. या उपाययोजनांमुळे सुरक्षित पर्याय हाच सर्वात सोपा पर्याय बनला आहे, आणि भारतीय उद्योगक्षेत्रही जागतिक मानकांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने सक्षम झाले आहे असे त्यांनी सांगितले.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेचा देशभरातील विस्तार तसेच, आणि या संघटनेने 127 वर्षांचा तांत्रिक नेतृत्वाचा जपलेला वारसा याबद्दलही मीना यांनी सांगितले. या संपूर्ण व्यवस्थेला मुख्यालय, परिमंडळ/उप-परिमंडळ कार्यालये तसेच, शिवाकाशी इथले फटाके संशोधन आणि विकास केंद्र (FRDC), पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा राष्ट्रीय अकादमी (- NAPES) चाचणी स्थानक यांसारख्या विशेष केंद्रांचे सहकार्यपूर्ण पाठबळ लाभले असल्याची बाबही त्यांनी अधोरेखीत केली.
प्रशिक्षण, सहयोग आणि सक्षम व्यक्तींचे परीक्षण तसेच नामनिर्देशन यांसह उद्योगांना त्रयस्थ पक्षाद्वारे तपासणीसह आधुनिक, जागतिकदृष्ट्या निर्धारित सुरक्षा प्रणालींचा स्वीकार सक्षम करण्यात पेसोची भूमिका देखील अधोरेखित करण्यात आली. अगदी एखादी मोठी घटना देखील अनेक वर्षांच्या प्रगतीला खीळ घालू शकते आणि संरचनेद्वारे प्रतिबंध हा त्यासाठी सर्वात परिणामकारक मार्ग आहे असे नमूद करत मीणा यांनी “सुरक्षा हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे” याचा पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील डीपीआयआयटीचे संचालक (स्फोटके विभाग) अमोल केत यांनी बीजभाषणात विकास, नवोन्मेष आणि सार्वजनिक विश्वास हे एकमेकांसोबत एकत्र वाटचाल करतात यांची सुनिश्चिती करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी भागीदारी करण्याच्या मंत्रालयाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
सदर कार्यक्रमाने ज्येष्ठ सरकारी अधिकारी, सार्वजनिक तसेच खासगी परिचालक तसेच औद्योगिक संघटनांना लक्ष्यित, उपायांवर आधारित चर्चांसाठी एकत्र आणले. यावेळी आयोजित सत्रांमध्ये पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, शहरी वायू वितरण (सीजीडी), औद्योगिक वायुंविषयक परिसंस्था, हायड्रोजन/हरित हायड्रोजन, अमोनियम नायट्रेट, स्फोटके आणि फटाके यांसारख्या मुद्द्यांबाबत विचारांची सशक्त देवाणघेवाण झाली. प्रमुख औद्योगिक संस्थांसह इंडिअन ऑईल,गेल, रिलायन्स, एमजीएल, सोलर उद्योग आणि इतर कंपन्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
चार संकल्पनाधारित चर्चांच्या माध्यमातून सहभागींनी अंतर्निहित संरचनात्मक सुरक्षा; तेल शुद्धीकरण कंपन्या, डेपो, कॅव्हर्न्स, जेट्टी आणि बहुइंधन विक्रीची किरकोळ दुकाने, संघटना-नियामक करार; ताफ्याच्या सुरक्षिततेचे प्रमाणित परिचालन मापदंड (एसओपीज);स्फोटकांचा संपूर्ण मागोवा (एसईटीटी); इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरचा स्वीकार; आणि आधुनिक रूप दिलेले लेआउट्स तसेच मॅगझिन्स आणि उत्पादन कारखान्यांचे यांत्रिकीकरण यांच्यासाठी टेम्प्लेट आधारित मंजुरी या मुद्द्यांवर चर्चा केली. उद्योग क्षेत्रातील सदस्यांनी संरचनेच्या टप्प्यावर स्पष्टता, मंजुऱ्यांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणि सशक्त क्षेत्र स्पर्धात्मकता यांसह पेसोच्या सहयोगात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले, आणि या बाबी परिचालकांना “वेगाने तसेच सुरक्षितपणे” कार्य करणे शक्य करतात असे सांगितले.
T26P.jpeg)
पेसोची थोडक्यात माहिती
पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षितता संघटना (पीईएसओ-पेसो) ही भारताची पेट्रोलियम पदार्थ, स्फोटके आणि कम्प्रेस्ड वायू यांच्यासाठीची राष्ट्रीय तांत्रिक नियामक संस्था आहे. सुमारे 127 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेली पेसो ही संस्था तेल शुद्धीकरण कारखाने, डेपो, पाईपलाईन्स, रस्त्यावर धावणारे टँकर्स, कॅव्हर्न्स, जेट्टीज तसेच शिप-शोअर इंटरफेसेस; सिलेंडर्स आणि प्रेशर व्हेसल्स, औद्योगिक आणि वैद्यकीय वापरासाठीचे वायू (क्रायोजेनिक्ससह) तसेच स्फोटके यांसह देशभरातील लाखो सुविधा आणि मालमत्तांना परवानगी देते आणि त्यांच्या कार्यावर लक्ष ठेवते. एनएसडब्ल्यूएसच्या माध्यमातून पेसोची डिजिटल परवानगी यंत्रणा तसेच एसईटीटी सारखे उपक्रम विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि अनुमानित विकासाला मदत करते.
सुषमा काणे/तुषार पवार/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197150)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English