सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीच्या आधारभूत आढाव्याबाबतची प्रकाशनपूर्व सल्लागार कार्यशाळा 26 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत संपन्न
Posted On:
26 NOV 2025 8:40PM by PIB Mumbai
मुंबई, 26 नोव्हेंबर 2025
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी), ग्राहक किंमत निर्देशांक(सीपीआय) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी)यांच्या आधारभूत आढाव्याबाबतची प्रकाशनपूर्व सल्लागार कार्यशाळा आयोजित केली. पुढच्या वर्षी प्रस्तावित सुधारणांची नवी मालिका जारी करण्यापूर्वी महत्त्वाच्या भागधारकांना त्याबाबत माहिती देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
या कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय संस्था, भारतीय रिझर्व्ह बँक, आघाडीचे अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्रातील धुरीण, शिक्षण क्षेत्रातील अग्रणी, ज्येष्ठ संख्याशास्त्र तज्ञ तसेच केंद्र आणि राज्य सरकारांतील ज्येष्ठ अधिकारी अशा सुमारे 160 जणांना एकत्र आणले. उद्घाटनपर सत्रात, ईएसी-पीएमचे अध्यक्ष प्रा.एस.महेंद्र देव, रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर डॉ.पूनम गुप्ता, एमओएसपीआय सचिव डॉ.सुभाष गर्ग आणि केंद्रीय सांख्यिकी विभागाचे महासंचालक एन.के.संतोषी यांची भाषणे झाली.
स्वागतपर भाषण करताना एन.के.संतोषी यांनी पद्धतशीर बदलांसह सध्या सीपीआय,आयआयपी आणि जीडीपी मध्ये होत असलेले आधारभूत बदल अधोरेखित केले तसेच या निर्देशांकांमध्ये वापरण्यात येत असलेल्या माहितीबद्दल स्पष्टीकरण दिले.
एमओएसपीआय सचिव डॉ.सुभाष गर्ग यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, देशात डाटा-चलित धोरण निर्मिती शक्य करण्यासाठी एमओएसपीआय सातत्याने उत्तम दर्जाचा आणि अचूक डाटा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
डॉ.पूनम गुप्ता यांनी डाटाबेस ऑन इंडियन इकॉनॉमी(डीबीआयई) बळकट करण्यासाठी, समयसूचकता सुधारण्यासाठी आणि सर्वेक्षण प्रणालींचा विस्तार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हाती घेतलेल्या उपक्रमांना अधोरेखित करत चलनविषयक धोरण आणि मॅक्रोइकॉनॉमिक विश्लेषणासाठी सुधारित जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीच्या महत्वावर अधिक भर दिला.
प्रा.महेंद्र देव यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि त्यांच्या भाषणात त्यांनी विश्वसनीय तसेच अद्ययावत आकडेवारी, अनौपचारिक क्षेत्रासाठी सुधारित मोजमाप, आणि जीएसटीएन, पीएफएमएस आणि एनपीसीआय प्रणालींसारख्या डिजिटल आणि प्रशासकीय डाटा स्त्रोतांचे एकत्रीकरण यांच्या महत्वावर भर दिला.
खुल्या सभागृहातील चर्चेत, सहभागींनी नवे डाटा स्त्रोत, धोरण आणि अंदाजांसाठी पारदर्शकता आणि परिणाम यांच्या बाबतीत अभिप्राय देत सक्रियपणे भाग घेतला. एमओएसपीआय अधिकाऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली आणि प्रस्तावित बदल स्पष्ट करून सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोप करताना, एमओएसपीआय सचिवांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि येत्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या सल्लागार कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हे महत्त्वाचे मॅक्रो-इकॉनॉमिक मापदंड निर्माण करण्यासाठी नियमितपणे माहिती पुरवल्याबद्दल त्यांनी घरांचे, उपक्रम आणि उद्योगांच्या योगदानाची देखील दखल घेतली.

WQSZ.jpeg)
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195015)
Visitor Counter : 4