इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सायबर सुरक्षा नवोन्मेष आव्हान 1.0 चा केला प्रारंभ

Posted On: 24 NOV 2025 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025

भारताची सायबर सुरक्षा परिसंस्था बळकट करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव, एस. कृष्णन यांनी  मंत्रालयाच्या माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता प्रकल्पांतर्गत सायबर सुरक्षा नवोन्मेष आव्हान 1.0 चा शुभारंभ केला.

24-11-2025  रोजी नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय येथे सरकारी अधिकारी, उद्योग तज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील  मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन झाले. एस. कृष्णन यांनी यासंबंधीचा संकल्पना व्हिडिओ, (https://innovation.isea.app/cyber_security_innovation_challenge)वेबसाइट, नोंदणी पोर्टलचे आणि सीएसआयसी 1.0 च्या नियम पुस्तिकेचे अनावरण केले.

त्यांनी दोन स्तरांवर म्हणजे उदयोन्मुख धोक्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याच वेळी तांत्रिक क्षमता मजबूत करणे यावर  राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाची गरज अधोरेखित केली आणि CSIC 1.0 हे दोन्ही उद्देश पूर्ण करते, असे स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील सायबर सुरक्षा आव्हानांचा अनुभव मिळतो. यातून केवळ कुशल व्यावसायिक तयार होतात आणि सायबर सुरक्षेला एक व्यवहार्य करिअर मार्ग म्हणून स्थान मिळते, असे नाही, तर यामुळे स्वदेशी, उत्पादन-केंद्रित उपायांना चालना मिळते, ज्यामुळे भारताची सायबर लवचीकता  वाढते. सायबर सुरक्षेसाठी 'संपूर्ण-राष्ट्र' हा दृष्टिकोन आवश्यक आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'संपूर्ण-सरकार' धोरणाच्या दृष्टिकोनाला प्रतिबिंबित करतो, यावर त्यांनी भर दिला.  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सी डॅ क,  शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रातील नेत्यांच्या सहयोगी उपस्थितीची दखल घेऊन, त्यांनी विजेत्या कल्पनांना किमान व्यवहार्य उत्पादन  टप्प्याच्या पलीकडे नेण्याचे आणि स्टार्टअप्स आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्यातून त्यांना स्केलेबल उपायांमध्ये विकसित करण्यासाठी मार्ग तयार करण्याचे महत्त्व सांगितले.

डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गोडसे, यांनी CSIC 1.0 च्या पाच-टप्प्यांच्या संरचनेबद्दल आणि DSCI, C-DAC आणि ISEA टीमच्या महिन्याभराच्या गहन विचारमंथनातून तयार झालेल्या विस्तृत प्रॉब्लेम स्टेटमेंट्सबद्दल माहिती दिली.

त्यांनी अधोरेखित केले की हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम विद्यार्थी आणि संशोधकांना सुरुवातीच्या टप्प्यापासूनच नवोन्मेष करण्यासाठी आणि उद्योजक मानसिकता  विकसित करण्यासाठी सक्षम करतो. डोमेन-स्पेसिफिक प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे BFSI, दूरसंचार आणि आरोग्यसेवा यांसारख्या भारतातील महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी व्यावहारिक, उपयोजनीय  उपाय तयार होतील, तर विविधतेच्या समर्थनावर  भर दिल्याने विद्यार्थी समुदायामध्ये नवोन्मेष संस्कृती रुजवली जाईल. हे आव्हान संशोधनातून उत्पादन विकासापर्यंतचा प्रवास जलद करेल आणि भारताच्या सायबर सुरक्षा परिदृश्याला बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2193881) Visitor Counter : 3