दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया पोस्टने मुंबई मेट्रो रेल महामंडळच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्वा मेट्रो मार्गिकेवर केले सेवा दालनाचे उद्घाटन आणि एका कलाकृतींचे अनावरण

Posted On: 21 NOV 2025 10:54PM by PIB Mumbai

मुंबई, 21 नोव्हेंबर 2025

भारताच्या टपाल विभागाने मुंबई मेट्रो रेल महामंडळासोबतच्या  (MMRCL) सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत एक्वा मेट्रो मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या, प्रवेश आणी बाहेर पडण्याचे मार्ग क्र. A2/A3 इथे भारतीय टपाल विभागाचे सेवा दालनाचे उद्घाटन आणि एका कलाकृतींचे अनावरण केले. आज, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकात हा कार्यक्रम झाला. मुंबई मेट्रो रेल्वे  सेवेच्या प्रवाशांच्या सुविधांचा तसेच अत्यावश्यक नागरिक-केंद्रित सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्यासह, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक कैय्या अरोरा तसेच भारतीय टपाल विभागाचे आणि तसेच मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या स्थानकावर नव्याने वसवलेल्या कलाकृतींमधून भारतीय टपाल सेवेची विविध उत्पादने आणि सेवांची मांडणी केली आहे. या कलाकृतींमुळे कलात्मक सौंदर्य आणि माहितीपूर्ण सामग्रीचा अनोखा संगम साधला गेला आहे. यामुळे प्रवाशांना टपाल विभागाचा वारसा आणि नवनवीन उपक्रम पाहण्याचा विशष अनुभवही घेता येत आहे.

मेट्रो स्थानकावरील टपाल विभागाच्या या समर्पित सेवा दालनाच्या माध्यमातून प्रवाशांना खाली नमूद सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत :

विस्तारीत वास्तव (AR) आधारीत टपाल पाकीटे, टपाल तिकीटाची संकल्पना घेऊन बनवलेली जलपानाची भांडी, पाण्याच्या बाटल्या आणि दैनंदिन वापराच्या बहुपयोगी पिशवी अशा टपाल तिकीटांशी संबंधित विविध वस्तू उपलब्ध करून देणारे एक सहाय्यक दालन.

प्रवाशांच्या सोयीकरता भारतीय टपाल विभागाच्या विविध सेवांची सर्वसमावेशक माहिती.

एक विशेष माय स्टॅम्प दालन. या दालनात नागरिक स्वतःचे फोटो असलेले वैयक्तिकृत टपाल तिकीट तयार करू शकतील, यामुळे त्यांना एक संस्मरणीय अनुभव मिळेल.

जास्त गर्दी आधुनिक वाहतूक केंद्रांच्या माध्यमातून  टपाल सेवा थेट नागरिकांपर्यंत घेऊन जाण्या बद्दलची भारतीय टपाल विभागाची वचनबद्धता या सहकार्यपूर्ण भागिदारीतून दिसून येते. 

आता या उपक्रमाचा आणखी विस्तार केला जाणार असून, पुढच्या टप्प्यात वांद्रे कुर्ला संकुल, सीप्झ आणि कफ परेड या आणखी तीन मेट्रो स्थानकांमधेही अशीच सोय उभारण्याचे नियोजन आहे.

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2192779) अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein: English