माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवा येथील पत्रकारांच्या प्रतिनिधीमंडळाने एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेडला (एचआरआरएल) दिली भेट

प्रविष्टि तिथि: 07 NOV 2025 9:32PM by PIB Mumbai

मुंबई, 7 नोव्हेंबर 2025

 

पत्र सूचना कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवा येथील वरिष्ठ संपादक आणि वार्ताहरांचे प्रतिनिधीमंडळ, 02 ते 08 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राजस्थानच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याचा एक भाग म्हणून पत्रकारांच्या पथकाने बाडमेर येथे भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांना एचआरआरएल प्रकल्पाची विस्तृत माहिती देण्यात आली. यात प्रकल्पाच्या सर्व प्रमुख पैलूंचा समावेश होता.

एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) शी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली की ग्रीनफील्ड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स बालोत्रा जिल्ह्यातील पाचपद्रा तालुक्यात आहे. एचआरआरएलची स्थापना एचपीसीएलने राजस्थान सरकारच्या सहयोगाने संयुक्त उद्यम भागीदारी अंतर्गत केली असून, यात एचपीसीएलचे 74%, तर राजस्थान सरकारचे 26% भाग भांडवल आहे. रिफायनरी कॉम्प्लेक्सची क्षमता 9 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (एमएमटीपीए) इतकी असून, यात 2.4 एमएमटीपीए पेट्रोकेमिकल उत्पादनांचा समावेश आहे.

एचआरआरएल रिफायनरी (तेल शुद्धीकरण प्रकल्प) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारली जात असून, यात अत्यंत ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली आणि प्रक्रियांचा वापर केला जात आहे. 'जेम ऑफ द डेझर्ट' म्हणून ओळखली जाणारी एचआरआरएल रिफायनरी आयात केलेले कच्चे तेल तसेच राजस्थानातील कच्चे तेल, दोन्हीवर प्रक्रिया करेल. डिझाइन केलेल्या कच्च्या तेलाच्या मिश्रणात 1.5 एमएमटीपीए राजस्थान क्रूड आणि 7.5 एमएमटीपीए आयात केलेले क्रूड समाविष्ट आहे. ही रिफायनरी 100% आयात केलेल्या कच्च्या तेलावर देखील प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केली आहे.

देशाच्या वाढत्या ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल गरजा लक्षात घेता, राजस्थान रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स हा एक धोरणात्मक प्रकल्प आहे. हा प्रकल्प पश्चिम राजस्थानच्या आर्थिक विकासासाठी देखील महत्वाचा आहे, कारण तो प्लास्टिक पार्क आणि सहाय्यक युनिट्सच्या विकासाला पाठिंबा देणारा एक प्रमुख उद्योग म्हणून काम करेल.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान, मोठ्या स्तरावर बांधकाम सुरू असताना सुमारे 35,000  कंत्राटी बांधकाम मंजुरांसाठी रोजगार निर्माण झाला आणि प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यापक बांधकाम परिसंस्थेद्वारे अप्रत्यक्षपणे सुमारे 100,000 लोकांना रोजगार मिळाला.

   

   

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2191613) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English