सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आय. आय. एम. नागपूरचे केस रिसर्च सेंटर ठरेल देशासाठी ‘स्टोरी इंजिन’ कॅनडाच्या तज्ञ व्हायोलेट्टा गॅलाघर यांचे प्रतिपादन


नागपूर बनले स्वतःचे केस रिसर्च केंद्र स्थापन करणारे देशातील सर्वांत तरुण आय आय एम

Posted On: 17 NOV 2025 7:10PM by PIB Mumbai

नागपूर, 17 नोव्हेंबर 2025 

 

“आय. आय. एम नागपूर ने सुरू केलेले केस रिसर्च सेंटर हे भारतीय व्यवसायांचे अनुभव, त्यांचे संघर्ष आणि यशोगाथा यांना जागतिक स्तरावर पोचवणारे एक “स्टोरी इंजिन” म्हणून कार्य करेल. यातूनच भारताच्या बिझनेस स्टोरीजचा अभ्यास जगभर केला जाईल,” असे प्रतिपादन आयव्ही पब्लिशिंग या कॅनडा मधील संस्थेच्या संचालिका व्हायोलेट्टा गॅलाघर यांनी केले. आयव्ही ही व्यवस्थापन क्षेत्रात अभ्यासाकरिता केस स्टडी तयार करणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाचि सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या सहकार्यानेच भारतीय प्रबंद संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नागपूरने सोमवारी आपल्या केस रिसर्च सेंटर (CRC) ची सुरूवात केली. भारतीय उद्योग, स्टार्टअप, सरकारी उपक्रम आणि सामाजिक संस्थांच्या वास्तव उदाहरणांवर आधारित केस स्टडी तयार करण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. यामुळे व्यवस्थापन शिक्षण अधिक भारतीय, अधिक व्यवहार्य आणि प्रत्यक्ष समस्यांशी जोडले जाणार आहे.

केंद्राच्या औपचारिक उद्घाटना नंतर आता आय. आय. एम. नागपूर हे असे स्वतंत्र केंद्र असलेले देशातील केवळ चौथे केवळ दहा वर्षांत असे केंद्र सुरू करणारे एकमेव असे संस्थान ठरले आहे.  

कार्यक्रमाला व्हायोलेट्टा गॅलाघर यांच्यासह आय. आय. एम. नागपूरचे संचालक प्रा. भीमराया मेत्री, आयव्ही पब्लिकेशनचे असोसिएट डायरेक्टर अलेजांद्रो गार्सिया, केस रिसर्च सेंटरचे प्रमुख प्रा. राकेश गुप्ता, व्यासपीठावर उपस्थित होते. आय. आय. एम. नागपूरचे ज्येष्ठ प्राध्यापक, विद्यार्थी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात प्रा. मेत्री यांनी भारत ही जगातील पुढची मोठी शक्ती असल्याचे सांगितले. “देशात हजारो बिझनेस स्कूल आणि तरुण लोकसंख्या आहे. अनेक परदेशी विद्यापीठे भारतात येत आहेत. या पार्श्वभूमीवर हे केस रिसर्च सेंटर एक महत्त्वाचा टप्पा ठरेल,” असे ते म्हणाले. 

   

केस रिसर्च सेंटरचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लाभ केवळ आय. आय. एम. नागपूरपुरते मर्यादित राहणार नाहीत. सुरुवातीला देशातील व्यवसाय शिक्षण देणाऱ्या नऊ प्रमुख संस्था या केंद्रासह ‘मेंबर बिझनेस स्कूल’ म्हणून जोडल्या गेल्या आहेत. या संस्थांना केंद्राच्या माध्यमातून आपल्या केस स्टडी तयार करण्याचे मार्गदर्शन, आणि जागतिक स्तरावरील केस स्टडीजचा अभ्यास करण्याची संधि प्राप्त होणार आहे. या नऊ संस्थांचे प्रतिनिधीही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यात अमृतवहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, संगमनेर; डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, नाशिक; फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली; आय. आय. एल. एम. लोधी  रोड; आय. एम. आय. कोलकाता; आय. एम. एस. गाझियाबाद; लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दिल्ली; पी. एम. एल. एस. डी  बिझनेस स्कूल, चंदीगड; आणि संजीवनी विद्यापीठ, अहिल्यानगर यांचा समावेश होता.

तत्पूर्वी प्रास्ताविकात बोलताना प्रो. राकेश गुप्ता यांनी ही केंद्र म्हणजे “एक स्वप्न साकार झाले” असल्याचे सांगितले. “देशात असे केंद्र असलेले आम्ही चौथे आय. आय. एम. आहोत आणि याचा फायदा आधीच इतर संस्थांना सुद्धा पोहोचू लागला आहे. नागपुरात या मध्यमातीन आम्ही राष्ट्रीय स्तरांचे शैक्षणिक केंद्र केंद्र उभारत आहोत,” असे ते म्हणाले.

समारोपात प्रो. यतीश जोशी, चेअरपर्सन – ब्रँड अँड मीडिया यांनी उपस्थित मान्यवर प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रशासनाचे आभार मानले.

 

* * *

पीआयबी नागपूर | सौरभ खेकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190943) अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein: English