वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव


भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 16 NOV 2025 6:51PM by PIB Mumbai

मुंबई, नोव्हेंबर 16, 2025

प्लास्टिक निर्यात क्षेत्रात भारताची प्रगती घडवणाऱ्या प्लेक्सकाॅन्सीलचा सत्तरावा वर्धापन दिन आणि निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभाला आज वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई येथे उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी परिषदेनं भारताच्या प्लास्टिक निर्यात उद्योगाची 70 वर्षांची सेवा पूर्ण केल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 202324 आणि 202425 या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांना गोयल यांनी एकूण 148  निर्यात उत्कृष्टता पुरस्कार  प्रदान केले.

आपल्या भाषणात गोयल यांनी प्लास्टिक उद्योगाला देशाच्या शाश्वतता ध्येयांनुसार आणि पुनर्वापरयोग्य  व पर्यावरणपूरक उत्पादनांच्या वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर 100% पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलण्याचे आवाहन केले. भारताकडे शाश्वत प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनण्यासाठी आवश्यक क्षमता आणि कौशल्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यासाठी प्रगत तंत्रज्ञान, नवकल्पनात्मक साहित्य आणि जबाबदार उत्पादन पद्धतींमध्ये गुंतवणूक करून भारताच्या हरित आणि शाश्वत भविष्याप्रति बांधिलकी उद्योगाने अधिक दृढपणे प्रदर्शित करावी, असे त्यांनी सांगितले.

प्लास्टिक उद्योगाने मोठी उद्दिष्टे ठेवायला हवीत. पुढील पाच वर्षांत देशांतर्गत बाजारपेठ 100 अब्ज अमेरिकी डाॅलर्स आणि निर्यात उत्पन्न 25 अब्ज अमेरिकी डाॅलर  इतके साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्राने प्रयत्न करावेत. गुणवत्ता, शाश्वतता, तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील अधिक सहभाग यांच्या साहाय्याने भारताचा प्लास्टिक उद्योग ही उद्दिष्टे गाठू शकेल आणि गाठणारच,” असे पीयूष गोयल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, विशेषतः मुक्त व्यापार कराराद्वारे आणि प्रमुख जागतिक भागीदारांसमवेत सुरू असलेल्या वाटाघाटींच्या माध्यमातून सरकारने निर्माण केलेल्या अभूतपूर्व बाजारपेठ संधींवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. मुक्त व्यापार करारांमुळे, भारतीय निर्यातदारांना नवीन संधी खुल्या होत असून ब्रिटन, ईएफटीए, अमेरिका, युरोप, ओमान, बहारीन आणि न्यूझीलंड सारख्या राष्ट्रांमध्ये सुधारित बाजारपेठ प्रवेश, व्यापारातील अडथळ्यांमध्ये घट आणि  स्पर्धात्मकतेमध्ये वृद्धी प्रदान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या बाजारपेठांमध्ये सक्रीय विस्तार करणे आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताच्या  समरसतेला बळकटी मिळण्यासाठी त्यांनी निर्यातदारांना प्रोत्साहित केले.

गुणवत्ता, विश्वासार्हता आणि स्पर्धात्मक उत्पादक क्षमता यांमुळे भारताकडे वाढत्या प्रमाणात, एक विश्वासार्ह आणि विसंबून राहाण्यायोग्य जागतिक सामग्री केंद्र म्हणून पाहिले जात आहे असल्याचे सांगून, त्यांनी उद्योगांना उत्पादन निर्मितीत विविधता  आणून आणि भारताच्या विस्तारणाऱ्या मुक्त व्यापार कराराच्या जाळ्यामुळे उदयास येणाऱ्या नव्या व्यापार संधींचा फायदा घेऊन ही गती कायम राखण्याचा आग्रह केला.

भारताच्या निर्यातीत, प्रगतीत, रोजगार निर्मिती आणि 'मेड इन इंडियाब्रँडवरील जागतिक विश्वासात योगदान देणारा, प्रत्येक पुरस्कारविजेता हा लवचिकता, नवोन्मेष आणि उत्कृष्टतेची कथा सादर करत असल्याचे निरीक्षण गोयल यांनी नोंदवले. जागतिक पुरवठा साखळीला चालना देणाऱ्या मोठ्या उत्पादकांपासून ते नवोन्मेषाला चालना सू्क्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत, सर्व पुरस्कारविजेते भारताच्या प्लास्टिक क्षेत्राची ताकद आणि विविधता प्रतिबिंबित करतात. ब्रँड इंडिया हा विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचे प्रतीक आहे आणि जागतिक मूल्य साखळीत भारताचे स्थान उंचावत असतानाही, गुणवत्तेशी तडतोड होता कामा नये, यावर त्यांनी भर दिला.

या प्रसंगी बोलताना, प्लेक्सकॉन्सिलचे अध्यक्ष विक्रम भदौरिया यांनी मंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यांनी प्लेक्सकॉन्सिलच्या 70 वर्षांच्या प्रवासात 200+बाजारपेठांमध्ये जागतिक अस्तित्व निर्माण करणाऱ्या भारतीय निर्यातदारांचा  अग्रणी हेतू प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190610) Visitor Counter : 19
Read this release in: English , Urdu