संरक्षण मंत्रालय
दक्षिण कमांडकडून 'अखंड प्रहार' सरावाचे आयोजन
Posted On:
13 NOV 2025 12:07PM by PIB Mumbai
भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने त्रि-सेवा सराव त्रिशूलचा भाग म्हणून वाळवंटात 'अखंड प्रहार' सराव यशस्वीरित्या आयोजित केला.

दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, यांनी सरावादरम्यान कोणार्क कोरच्या परिचालन तयारीचा आढावा घेतला.
0XWP.jpeg)
या सरावाने रुद्र ब्रिगेडद्वारे जमिनीवरील मोहिमा, विशेष हेलिकॉप्टर अभियाने, लष्कराच्या हवाई शाखेद्वारे समन्वित हेलिकॉप्टर हल्ला मोहिमा, यांपासून यांत्रिक आणि पायदळ सरावापर्यंत सर्व शस्त्रे आणि सेवांच्या एकात्मिक संचालनाच्या माध्यमातून कोणार्क कोरची संपूर्ण युद्धसज्जता प्रमाणित केली.

या सरावात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल यांच्यातील अखंड समन्वयाचे दर्शन घडले. सैन्यदलाच्या निकट साहाय्याने लढाऊ विमानांनी जमिनीवर केलेले हल्ले यात समाविष्ट होते.

या सरावाने वास्तववादी युद्धभूमीच्या परिस्थितीत पुढील पिढीतील स्वदेशी तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी वास्तविक वेळ परीक्षण स्थळ म्हणूनही भूमिका बजावली. स्वदेशी ड्रोन, मानवरहित प्रणाली, ड्रोनरोधी प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध ग्रिडचा वापर, यातून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या राष्ट्रीय दृष्टिकोनानुरूप भारताच्या तंत्रज्ञानाचा वाढता परिघ अधोरेखित करण्यात आला.

कोणार्क कोरचे रूपांतर बहुआयामी,महत्त्वपूर्ण मोहिमांसाठी एका आधुनिक, चपळ, भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज दलात झाले असल्याची पुष्टी या सरावाने केली.
सेना कमांडरनी सर्व सहभागी संरचना आणि एककांची त्यांची निपुणता, नावीन्यपूर्णता आणि संयुक्त परिचालन उत्कृष्टता यासाठी प्रशंसा केली, जे दक्षिण कमांडच्या संयुक्तता, तंत्रज्ञान अवलंब आणि परिचालन उत्कृष्टतेच्या नीतिमत्तेचे प्रतीक आहे.
YPNV.jpeg)
अखंड प्रहार सरावाने भारतीय सैन्याची परिचालन उत्कृष्टता, संयुक्त दल एकात्मता आणि अचूक युद्धतंत्र यासाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
***
SushamaKane/SonaliKakade/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189592)
Visitor Counter : 27