संरक्षण मंत्रालय
लष्कर आणि हवाई दलाच्या समन्वयशक्ती चे प्रदर्शन
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2025 2:31PM by PIB Mumbai
पुणे/ जैसलमेर, 12 नोव्हेंबर 2025
भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने सेनेतील समन्वयाचे उत्तम दर्शन घडविले. दोन्ही दलांनी संयुक्त कौशल्य आणि मोहिमांसाठी सदैव तयारीत असल्याचे दाखवत, एकात्मिक त्रि-सेवा सराव ‘त्रिशूल’चा भाग म्हणून दक्षिण कमांड अंतर्गत ‘सुदर्शनचक्र कॉर्प्स’सह नेत्रदीपक प्रदर्शन करत मारुज्वालाच्या सरावाचे एकत्रितपणे हवाई प्रदर्शन केले.
1AG4.jpeg)
या अचूकता, समन्वय आणि कार्यवाहीच्या उत्कृष्टतेच्या सरावाच्या प्रभावी प्रदर्शनाच्या वेळी परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे उपस्थित होते. त्यांनी एअरबोर्न फोर्सेस, सुदर्शन चक्र कॉर्प्स आणि भारतीय हवाई दलाचे उत्कृष्ट कार्यवाहीच्या तयारीबद्दल प्रसंशा केली.
या सरावातून भारतीय सशस्त्र दलांच्या जटिल हवाई कारवाईंचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याच्या समन्वयित क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले.
AQKZ.jpeg)
* * *
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2189162)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English