संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने ‘कोकण विजय 2026’ या खुल्या सागरी नौकानयन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला

प्रविष्टि तिथि: 11 NOV 2025 10:01PM by PIB Mumbai

मुंबई, 11 नोव्हेंबर 2025

 

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाने, आपल्या सर्वात उद्यमशील नौदल युनिट (मेनू) द्वारे आयोजित "कोकण विजय 2026" या खुल्या सागरी नौकानयन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. ही मोहीम "स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोकण" या भावनेला मूर्त रूप देते. येत्या 10 दिवसांत, महाराष्ट्र संचालनालयाचे 60 छात्रसैनिक (एनसीसी कॅडेट्स) भव्य आणि निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर 127 सागरी मैलांचा प्रवास करतील. या मोहिमेत रणपार, आंबोळगड, पूर्णगड, धौलवाली आणि विजयदुर्ग या बंदरांना भेट दिली जाईल. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पाठबळाने ही मोहीम आयोजित करण्यात आली असून, युवा छात्रसैनिकांमध्ये  नौकानयन, सांघिक भाव, साहसी भाव आणि किनारपट्टीवरील  पर्यावरणविषयक जागरूकता वाढवणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूरचे, ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. कॅप्टन (आयएन) जेनिश जॉर्ज, संचालक, एनसीसी संचालनालय महाराष्ट्र, कमांडंट शैलेश गुप्ता, भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी तळाचे कमांडिंग ऑफिसर, नितीन बगाटे, आयपीएस पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, आणि संदीप कृष्णा, आयआरएस सहाय्यक अधीक्षक, सीमाशुल्क, यावेळी उपस्थित होते.  ब्रिगेडियर पैठणकर यांनी छात्रसैनिकांच्या उत्साहाचे आणि समर्पणाचे कौतुक केले  आणि अशा मोहिमा केवळ सागरी कौशल्येच वाढवत नाहीत, तर शिस्त, लवचिकता आणि राष्ट्राभिमानची भावना देखील निर्माण करतात, असे त्यांनी अधोरेखित केले.

"कोकण विजय 2026" ही मोहीम, भारताच्या भावी सागरी नेतृत्वाचे संगोपन करण्याबरोबरच स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध किनारी प्रदेशांना प्रोत्साहन देण्याच्या एनसीसीच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2189030) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English