संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समन्वयातून सामर्थ्याची निर्मिती

Posted On: 11 NOV 2025 11:16AM by PIB Mumbai

दक्षिण  कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, धीरज सेठ यांनी लष्कराच्या तिन्ही दलांच्या ‘त्रिशूल’ या युद्धसरावाचा एक प्रमुख भाग म्हणून आयोजित केलेल्या ‘अखंड प्रहार’ या सरावादरम्यान ‘कोणार्क कॉर्प्स’ च्या ऑपेरेशनल तयारीचा आढावा घेतला. या सरावाचा उद्देश भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने एकात्मिक, बहु-क्षेत्रीय मोहिम आयोजित करण्याची भारतीय लष्कराची क्षमता सिद्ध करणे हा होता.

लष्कर कमांडर यांनी संयुक्त शस्त्रास्त्र कवायतीचे निरीक्षण केले, ज्यामध्ये अखंड आंतर-सेवा समन्वय, रणनीती, तंत्र आणि प्रक्रिया यांचा वापर तसेच ड्रोन आणि ड्रोन-प्रतिबंधात्मक प्रणालीसह पुढील पिढीच्या युद्घभूमी तंत्रज्ञानाचा वापर दर्शविण्यात आला. या सरावाने क्षेत्रीय परिस्थितीत नवीन समाविष्ट केलेल्या प्लॅटफॉर्म आणि स्वदेशी नवोपक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी रिअल-टाइम टेस्टबेड म्हणूनही काम केले.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ‘बॅटल ॲक्स डिव्हिजन’ आणि ‘कोणार्क कॉर्प्स’ च्या युद्धक्षेत्रातील नवोपक्रमांचा देखील आढावा घेतला, ज्यात स्वदेशी बनावटीचे ड्रोन, ड्रोन-प्रतिबंधात्मक उपकरणे आणि प्रगत सुरक्षा दल संरक्षण उपाययोजनांचा समावेश होता. हे उपक्रम ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पनेवर वाढत असलेला भर आणि भारतीय सेनेच्या निर्मिती स्तरावर नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याची भारतीय सैन्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात.

लष्कर कमांडरनी ‘कोणार्क कॉर्प्स’ आणि ‘बॅटल अ‍ॅक्स डिव्हिजन’ चे तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर, अनुकूलता आणि ऑपरेशनल तयारीच्या उच्च मानकांबद्दल कौतुक केले. ‘अखंड प्रहार’ सराव भारतीय सैन्याची ‘संयुक्तता’, ‘आत्मनिर्भरता’ आणि ‘नवोपक्रम’ या ‘जय’ मंत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सैन्याचा असलेला भर याची पुष्टी करत आहे, त्यामुळे बहु-क्षेत्रीय युद्धक्षेत्रात समन्वय, तंत्रज्ञानाचा वापर आणि मिशन-सज्जता यांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यात दक्षिण कमांडची भूमिका अधोरेखित होते.

***

NitinFullluke/ShileshPatil/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2188669) अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein: English