सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर’तर्फे 10 ते 14 नोव्हेंबर 2025  दरम्यान "संविधान - एक चित्रात्मक अभिव्यक्ती" प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 08 NOV 2025 6:21PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (एससीझेडसीसी) नागपूर’तर्फे 10 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी  6  या वेळेत  "संविधान - एक चित्रात्मक अभिव्यक्ती" या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन 10  नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या संविधानाच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून केंद्राने संविधानाचा वारसा आणि आत्मा अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

75 दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण छायाचित्रे असलेले एक विशेष प्रदर्शन प्रदर्शित केले जाणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि योगदान तसेच भारतीय संविधान निर्मितीचे चित्रण असलेली  छायाचित्रे समाविष्ट आहेत. या प्रदर्शनात  10  प्रमुख ठिकाणांवरील दृश्ये प्रदर्शित केली जातील - दशभूमी, जन्मभूमी, निर्धारभूमी, संकल्पभूमी, क्रांतीभूमी, मुक्तिभूमी, प्रेरणाभूमी, विद्याभूमी, धम्मभूमी आणि चैत्यभूमी.

या प्रदर्शनात दाखवलेली सर्व छायाचित्रे प्रसिद्ध छायाचित्रकार शेखर सोनी यांनी टिपली आहेत. नागरिकांना मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि इतिहासाद्वारे  हा दृश्य प्रवास अनुभवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

***

माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187851) अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein: English