ऊर्जा मंत्रालय
पॅरिस येथे झालेल्या जागतिक अणु प्रदर्शन 2025 मध्ये राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने भारताच्या प्रगतीशील अणुऊर्जेचा दृष्टिकोन मांडला
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या महासंचालकांनी इंडिया पॅव्हेलियनमधील एनटीपीसीच्या स्टॉलला भेट दिली
Posted On:
05 NOV 2025 5:39PM by PIB Mumbai
मुंबई, 5 नोव्हेंबर 2025
भारताची सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा उत्पादक कंपनी असलेल्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने फ्रान्स मध्ये पॅरिस, येथे 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या जागतिक अणु प्रदर्शन 2025 मध्ये सहभाग घेत अणुऊर्जा क्षेत्रातील देशाच्या वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. याद्वारे जगातील आघाडीच्या नागरी अणु उद्योगांच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये एन टी पी सी ने पहिल्यांदाच सहभाग नोंदविला आहे.
या प्रदर्शनात एनटीपीसीचे प्रतिनिधित्व करताना, मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल आणि उपव्यवस्थापक सुमित दशमाना यांनी अणुऊर्जा निर्मितीमध्ये प्रवेश करण्यासाठी एनटीपीसीने आखलेल्या पथदर्शी धोरणाविषयी उपस्थितांना माहिती दिली, आपल्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांत वैविध्य आणण्यासाठी आणि भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या प्रदर्शनादरम्यान, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी आणि जागतिक अणुऊर्जा संघटनेच्या महासंचालक डॉ. सामा बिलबाओ वाई लिओन यांनी भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या इंडिया पॅव्हेलियनमधील एनटीपीसीच्या स्टॉलला भेट दिली. तसेच एनटीपीसीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि भारतात अणुऊर्जा विकासाला चालना देण्यासाठी एनटीपीसी करत असलेल्या प्रयत्नांचे आणि दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले.

जागतिक अणु प्रदर्शन 2025 मध्ये एनटीपीसी ने घेतलेला सहभाग हा शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जा उपायांच्या दिशेने नवीन संधींचा शोध घेतानाच 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्याच्या देशाच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186681)
अभ्यागत कक्ष : 47